Home महत्वाची बातमी सी डेट एक्सप्लोजीव्ह कंपनीच्या कामगारांनी दिला माणुसकीचा परीचय

सी डेट एक्सप्लोजीव्ह कंपनीच्या कामगारांनी दिला माणुसकीचा परीचय

112
0

 

रवींद्र साखरे – तळेगांव (शा पंत) 

वर्धा –  माणसातील माणुसकी जिवंत असली की कोणत्याही परिस्थितीत मनुष्य दुसऱ्यासाठी देवदूताची भूमिका बजावत असतो,तो माणुसकीच्या खातर ज्यांची मदत करतो त्यांना तो मदत करणारा ईश्वराचे रूप वाटत असतो,असाच काही अनुभव तळेगांव च्या सी डेट एक्सप्लोजीव्ह प्रा ली कंपनीच्या कामगारांनी आणून दिला आहे, आपल्यातीलच कामगार संदीप वानखडे हे कॅन्सर ग्रस्त असल्याचे जेव्हा तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कळले तेव्हा त्यांनी एकमताने त्या कामगारांची मदत कटण्याचे ठरविले,सगळ्या कामगारांनी एकत्र येऊन प्रत्येकाने आपल्या हीस्यातील रक्कम जमा केली व तब्बल 91 हजाराची मदत त्या कॅन्सरग्रस्त कामगाराला उपचारासाठी दिले,यासाठी त्यांना कंपनी प्रशासनाने देखील मदत केली हे विशेष.जेमतेम परिस्थिती असलेल्या त्या कामगाराला उपचारासाठी लागेल ती मदत सगळ्या कामगार मित्रांनी केली खरी पण उपचार घेत असतानाच तो कॅन्सरग्रस्त युवक नियतीपुढे हरला व त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.एकाएकी घरातील कमावत्या माणसाचे देहावसान झाल्याने त्या कुटूंबावर मोठा आघात झाला होता,ही बाब कामगारांच्या लक्षात आली,त्यांनी लगेच क्षणाचाही विलंब न लावता पुन्हा सर्वांनी पैसे जमा केले व 61 हजार रुपयांचा धनादेश त्या मृतकाच्या पत्नीच्या म्हणजेच रुपाली संदीप वानखडे यांच्या स्वाधीन केला.खर म्हणजे पैसा माणसाची उणीव भरून काढू शकत नाहीच पण त्या पैशामुळे त्या कुटूंबाला मोठा आधार प्राप्त झाला असुन सगळे कामगार त्या कुटूंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने आघात झालेल्या कुटूंबाला मोठा आधार प्राप्त झाला आहे, व यातून कंपनीच्या कामगारांच्या माणुसकीचे दर्शन प्राप्त झाले आहे.यावेळी या सर्व मदतीसाठी सी डेट कामगार संघटना तळेगांव शा पंत, चे अध्यक्ष मिलिंद देशपांडे, कार्याध्यक्ष योगेश खारकर,सचिव अनिल लांडे,उपाध्यक्ष पुंडलिक टरके,कोषाध्यक्ष शरद टरके,सदस्य प्रदीप टरके,मनोज कोथडकर, संजय खेरडे,संदीप सहारे यांनी अथक परिश्रम घेतले

Previous articleपत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून विधिमंडळात ५ स्वीकृत आमदार घ्या. “पत्रकार संरक्षण समिती”चे राज्यपालांना साकडे
Next articleकारंजा घाडगे येथील कारनदी मत्स्यव्यवसाय कांचे आमरण उपोषण
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.