Home मुंबई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या उप सचिव मेघना तळेकर यांनी आदरांजली वाहिली.

55
0

 

के .रवि ( दादा ) ,,

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या उप सचिव मेघना तळेकर यांनी आदरांजली वाहिली.
अवघ्या हिंदुस्थानचे दिशादर्श छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीनिमित्ताने अवघा महाराष्ट्र भारत आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून त्यांना वंदन केले जात आहे.

महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अवघा महाराष्ट्र भारत आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून त्यांना वंदन केले जात आहे. अलौकीक बुद्धिमत्ता, जिद्द, चिकाटी आणि संयम या गुणाद्वारे कोणत्याही संकटाला तोंड देता येते. शत्रूवर लिलया मात करता येते हे शिवाजी महाराजांनी वारंवार दाखवून दिले. राज्य कारभार करताना त्यांनी घालून दिलेला आदर्श आणि आयुष्यभर पाळलेली नीतीतत्वे आजही मार्गदर्शक आहेत.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत मुठभर मावळ्यांच्या सोबतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी रोवलेली स्वराज्याची मुहूर्तमेढ अविरत तेवते आहे. त्यांच्या निधनानंतर आज शेकडो वर्षे उलटून गेली तरीही त्यांच्या शिकवणीवर त्यांचे स्वराज्य आज वाटचाल करते आहे. औरंगजेब आणि आदिलशाह यांच्यासारख्या त्या काळच्या बलाढ्य शत्रूसोबत लढा देणे तेव्हा साधी गोष्ट नव्हती. शिवरायांनी ती लिलया पेलली. त्याचे औचित्य साधून आज मुंबई च्या विधान भावनातील पुतल्यास आदरांजली वाहन्यात आली .

Previous articleबेस्टच्या जनसंपर्क अधिकारी पदी मनोज वराडे यांची नियुक्ती
Next articleसाहस फाउंडेशनचा वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतीथी साजरी करण्यात आली
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.