Home महत्वाची बातमी “पाण्याची किंमत ओळखुन त्याचे संवर्धन करा” – प्रा. डॉ. प्रमोद यादगिरवार यांचे...

“पाण्याची किंमत ओळखुन त्याचे संवर्धन करा” – प्रा. डॉ. प्रमोद यादगिरवार यांचे प्रतिपादन

105
0

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे संयुक्त विद्यमाने “पाणी संवर्धन” कार्यशाळेचे आयोजन

यवतमाळ – जगात ७० टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे, हे सर्वश्रुत आहे. परंतु यापैकी केवळ ०.२ टक्के पाणीसाठा पिण्यास योग्य असून नदी, धरणे, तलाव आदींमध्ये उपलब्ध आहे. या पाणीसाठ्यात २००० वर्षांत कोणताही बदल झाला नाही, परंतु लोकसंख्या वाढीमुळे दरडोई पाण्याची उपलब्धता मात्र कमी झाली आहे. त्यामुळे आजच पाण्याची किंमत ओळखून त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने संवर्धन करा”, असे प्रतिपादन वरीष्ठ संशोधक प्रा. डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी केले. नुकतेच दि. ३० रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे संयुक्त विद्यमाने “पाणी संवर्धन” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरीष्ठ स्तर) एम. आर. ए. शेख उपस्थित होते. कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. प्रमोद यादगिरवार, सहयोगी संचालक, क्षेत्रीय कृषी संशोधन केंद्र, विदर्भ विभाग व प्रा. डॉ. सुप्रभा यादगिरवार, प्राचार्य, अमोलकचंद विधी महाविद्यालय यांचेसह प्रा. डॉ. विजेश मुनोत व प्रा. डॉ. संदीप नगराळे व्यासपीठावर विराजमान होते.

सर्वप्रथम प्रा. छाया पोटे यांनी प्रास्ताविक तसेच पाहुण्यांचा परीचय करून दिला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी कार्यशाळेला समयोचित मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आभार प्रदर्शन पॅरा विधी स्वयंसेवक निखिल सायरे यांनी केले. या कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी प्रा. वैशाली फाळे, प्रा. अंजली दिवाकर, प्रा. वंदना पसारी, प्रा. स्वप्नील सगणे यांचेसह शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यशाळेला अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी तथा पॅरा विधी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमहाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन यवतमाळ वतीने “नारीशक्ती चा सन्मान”
Next articleबेस्टच्या जनसंपर्क अधिकारी पदी मनोज वराडे यांची नियुक्ती
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.