कोण हा रवि , रविच्या वाढत्या महसुल मधील प्रस्थाला भाजपाचा ब्रेक
राळेगांव – भारतीय जनता पार्टी तालुका राळेगांवच्या वतीने उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना शहरासह तालुक्यातील महत्वाच्या विविध प्रश्नाच्या संदर्भात निवेदन दिले आहे . निवेदनातील प्रश्नाची सोडवणूक प्रशासनाने करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी जन आंदोलन उभे केल्या शिवाय राहणार नाही असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
राळेगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तो कधी सोडवण्यात येणार याकडे निवेदनातून लक्ष वेधले आहे. त्याच प्रमाणे आष्टोना गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने मांडलेला उच्छाद यामुळे शांतता व सुव्यवस्था धोक्यात आल्याचा मुद्दा यात घेण्यात आला आहे. शहरासह तालुक्यात गौण खनिजाची चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे गौण खनिजाची चोरी करून विना रॉयल्टी मुरूम रवि माहुरकर हा गृहस्थ नेत असल्याने एक प्रकारे रॉयल्टी नसतांना हे काम करणे म्हणजे प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक केल्यासारखे आहे. राळेगाव तालुक्यात आपले आयुष्य व्यतीत करणारे व्यवसायिक कोरोनामुळे आर्थिक दुर्बल झाले आहे यातच रवी माहुरकर हे या तालुक्याचे नसताना त्यांचा शिरकाव अचानक राळेगाव तहसील मध्ये झाला कसा ? तहसीलमधील रविच्या वाढत असलेले प्रस्थ नेमकं कोणामुळे ? असे अनेक प्रश्न जनते पुढे आहे. या सर्व प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष घालावे. सर्वांना समान न्याय देऊन प्रश्न सोडवावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस एड. प्रफुल्ल चौहान, शहराध्यक्ष डॉक्टर कुणाल, तालुका सरचिटणीस अभिजीत कदम, माजी तालुकाध्यक्ष जयप्रकाश वर्मा, गोविंद डोंगरे, अनिल राजूरकर, संजय इंगळे, संदीप पवार, अनिल वर्मा, प्रवीण शेलोटे, अरुण देहारे, मोरेश्वर डाखोरे, सागर वर्मा, सचिन चौहान, आकाश कुळसंगे अभिजीत धोबे, अंकित ढुमणे, विशाल धनकसार आदी कार्यकर्ते निवेदन देतांना उपस्थित होते .

