Home यवतमाळ घाटंजी तालुक्यातील ‘ताडसावळी’ येथील निम्न पैनगंगा प्रकल्प फेर रचनेचा अहवाल विधान परिषदेत...

घाटंजी तालुक्यातील ‘ताडसावळी’ येथील निम्न पैनगंगा प्रकल्प फेर रचनेचा अहवाल विधान परिषदेत सादर..!

1366

अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी – महाराष्ट्र व आंध्रप्रदेश येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या घाटंजी तालुक्यातील ताडसावळी येथील निम्न पैनगंगा प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून अडकला आहे. त्यामुळे १ हजार ४०२ कोटी ४३ लक्ष रुपयांचा खर्च असलेला निम्न पैनगंगा प्रकल्पाची किंमत सद्यातरी १८ हजार कोटींवर पोहचली आहे. निम्न पैनगंगा प्रकल्पाला आजपर्यंत एकही शासनाने या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिला नसल्याने अनेक कंत्राटदाराने वैतागून निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम अर्धवट पणे सोडुन दिले आहे. घाटंजी (जि. यवतमाळ) तालुक्यातील ताडसावळी येथे होणारा निम्न पैनगंगा प्रकल्प हा विदर्भात दुसऱ्या क्रमांकाचा प्रकल्प प्रस्तावित आहे. आर्णीचे तत्कालीन आमदार व माजी मंत्री अँड. शिवाजीराव मोघे यांनी पाठपुरावा करून भाजपा शिवसेना युतीच्या काळात शासकीय मान्यता मिळवली होती. विशेष म्हणजे निम्न पैनगंगा प्रकल्पाला “निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचा” प्रखर विरोध होता. सदर प्रकल्पाविरोधात नागपूर व औरंगाबाद उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल व प्रलंबित होत्या. जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना काही परवानग्या न मिळाल्याने सद्यातरी निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद असून रखडला आहे. विशेषतः निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम सन २०१२ मध्ये सुरू झाले होते. अजुनही केंद्र सरकारच्या काही परवानग्या नसल्याचा आरोप धरण विरोधी संघर्ष समितीने केला आहे. आँक्टोंबर २०१४ मध्ये निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी केंद्र सरकारने आवश्यक त्या परवानग्या दिल्या होत्या. त्या दरम्यान विधानसभेची निवडणूक झाली. राज्यात भाजपा शिवसेना युतीचे सरकार आले. त्या नंतर ही १० वर्षाचा काळ झाला. मात्र, अजुनही निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम सुरु झालेले नाही. भाजपा शिवसेना युतीच्या काळात प्रकल्पा पेक्षा बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून न देण्यात आल्याने काम थांबले होते. तेलंगणा सरकारने महाराष्ट्र शासनाची परवानगी घेत धरण्याच्या खालच्या बाजूच्या सिमेवर चनाखा – कोरटा येथे ३६० कोटी रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला असून महाराष्ट्र शासन अजुनही तांत्रिक मुद्यामध्ये अडकल्याने तुर्त तरी निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद पडले आहे. घाटंजी तालुक्यातील ताडसावळी येथील निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी २७ जुन १९९७ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्या वेळी प्रकल्पाची किंमत १४०२ कोटी ४३ लक्ष रुपये प्रस्तावित होती. तसेच सदर प्रकल्पाची वाढीव किंमत अंदाजे २२ हजार कोटी रुपये आहे. निम्न पैनगंगा प्रकल्पाची सिंचन क्षमता २,२७,२७१ कोटी हेक्टर आर असुन त्यात यवतमाळ जिल्हा १,४१,६०७ हेक्टर, चंद्रपूर जिल्हा ५८.३५५ हेक्टर, आदिलाबाद जिल्हा २७.३०९ हेक्टर, अधिग्रहीत जमीन ७६९.९५ हेक्टर जमीनीचा समावेश आहे. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या काळात सदरचा निम्न पैनगंगा प्रकल्प प्रकल्प येत्या दोन महिण्यात निर्णय घेउन लवकरच कामाची निविदा काढण्यात येईल, असे आश्वासन या वेळी विधान परिषदेत जयंत पाटील यांनी दिले.
➡️ दरम्यान, निम्न पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता धनश्याम थोटे यांच्याशी संपर्क केला असता, यवतमाळच्या निम्न पैनगंगा प्रकल्प कार्यालयाकडुन नासीक येथील राज्य स्तरीय तांत्रिक सल्लागार समिती कडे फेर रचनेचा अहवाल तपासणीसाठी सादर करण्यात आला आहे. तसेच राज्य स्तरीय समिती मार्फत सदर फेर रचनेचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आल्याची माहिती निम्न पैनगंगा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम थोटे यांनी दिली.
घनश्याम थोटे,
कार्यकारी अभियंता, निम्न पैनगंगा प्रकल्प विभाग, यवतमाळ