यवतमाळ / वाणी – “शिवशाही फाउंडेशन, भारत” ही संस्था महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन तसेच ‘जय भवानी जय शिवाजी ‘,’बहुजन हिताय बहुजन सुखाय ‘ही विचारसरणी असलेल्या संस्थेच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी सौ.संगीताताई खाटोल कार्याध्यक्षपदी सौ.संध्याताई रामगिरवार व. रा.वणी ता.वणी जि.यवतमाळ यांची निवड करण्यात आली आहे. सौ.संगीताताई व संध्याताई जी गेली 10वर्षे सामाजिक क्षेत्रात विविध सेवा देत आहेत. त्यानी विविध माध्यमातून गरजूंना साहित्य वाटप, वृक्षारोपण तसेच संवर्धन, स्वच्छता मोहीम, खाऊ वाटप असे कार्यक्रम असतात.
शिवशाही संस्था देशातील विविध राज्यात आपले समाजकार्य करत आहे, या संस्थेचे कार्य समाजात राष्ट्रीयत्व, बंधुता,न्याय, समता या भावना निर्माण करणे व उपेक्षित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे. या संस्थेचे शैक्षणिक, आरोग्य ,कला व व सांस्कृतिक, क्रीडा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत साहित्य वाटप, पर्यावरण संवर्धन, महिला सशक्तिकरण, सामाजिक न्याय, शासकीय योजना व कार्यशाळा शिबिर, संशोधन या संबंधीत कार्यशाळा आशा विविध क्षेत्रांमध्ये त्याचे कार्याने व्यापले आहे. संस्थेमध्ये सर्वांना समान अधिकार आहेत. सौ.संगीताताई जी संस्थेच्या हितासाठी, वाढीसाठी तसे समाजाहितासाठी प्रामाणिकपणे व प्राधान्याने काम करतील असा विश्वास संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बाळाराम माडकर यांनी व्यक्त केला .आज नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बाळाराम माडकर, जिल्हा कार्याक्रमपमुख चैतन्या तुरविले,संगीता खाटोल, संध्या रामगिरवार,सामाजिक कार्यकर्ते-शाहिन पठाण, अल्का जाधव, सुश्रीता गोडे,सवीता रासेकर, वैशाली तायडे इत्यादी उपस्थित होते.


