Home मुंबई आ. बांगर यांच्या तोंडाला काळे फासू.:-पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

आ. बांगर यांच्या तोंडाला काळे फासू.:-पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

44
0

 

मुंबई , (प्रतिनिधी)  – बहुजन ह्रदय सम्राट अँडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बिनबुडाचे आरोप करणाऱ्या सेना आमदार संतोष बांगर यांचा जाहीर निषेध करत असून मुंबईत दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅंटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनीं दिला.

विद्रोहि पत्रकार डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की, अंगातील रक्त सांडले काय, धमण्या बंद पडून आटल्या काय आणी स्वास बंद पडून आयुष्य संपले काय? संपूर्ण जीवनच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच! आणी त्यांच्या वंशजांची बदनामी ऐऱ्या गैऱ्या नंत्थू खैर्याकडून माझ्यासारखा आंबेडकरवादी खपवून घेणार नाही.

आमदार संतोष बांगर यांनी आपल्या औकाती पलीकडे विधान केले असून ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वरील आरोप 10 दिवसात सिद्ध करावेत, किंवा जाहीर माफी मागावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे कार्यकर्ते व पॅन्थर् ऑफ सम्यक योद्धाचे पॅन्थर मुंबईत दिसतील तिथे बांगर यांच्या तोंडाला काळे फासतील असा इशारा डॉ. माकणीकर यांनी दिला.

देशातील महानायक वा महानायिका वा तयाचे वंशजां वर कदापी चिखलफेक सहन केली जाणार नाही, बांगर सारख्या दांभीक विकृती ला ठेचून काढण्याची धमक आंबेडकरी समुदायात असून या कामी सर्वात पुढे रिपाई डेमोक्रॅटिक चे कार्यकर्ते व पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा चे पॅन्थर असतील याची जातीवादयानीं नोंद घ्यावी असाही ईशारा पॅन्थर माकणीकर यांनी दिला.

Previous articleमाननीय श्री बच्चुभाऊ कडू (राज्यमंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य) यांनी घेतली जि.प. प्राथमिक मराठी शाळा तोंगलाबाद शाळेची दखल
Next articleशिवशाही फाउंडेशन,भारत च्यायवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी सौ.संगीताताई खाटोल व कार्याध्यक्षपदी सौ.संध्याताई रामगिरवार यांची निवड…
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.