Home विदर्भ माननीय श्री बच्चुभाऊ कडू (राज्यमंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य) यांनी घेतली जि.प....

माननीय श्री बच्चुभाऊ कडू (राज्यमंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य) यांनी घेतली जि.प. प्राथमिक मराठी शाळा तोंगलाबाद शाळेची दखल

99
0

 

दर्यापुर प्रतिनिधी -: धनराज खर्चान

अमरावती – आदर्श मुख्याध्यापक आदरणीय श्री नंदू भाऊ रायबोले व कुमारी तेजस्विनी ताई अटाळकर सहायक शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा तोंगलाबाद यांनी लोकसहभागातून 8 लक्ष रुपयाचा निधी शाळेसाठी गोळा करून जिल्ह्यातील पहिली डिजिटल व I. S. O. नामांकन प्राप्त करून ग्राम तोंगलाबाद येथे गुणवत्तेमध्ये सन्मान गुणवत्तेचा व सन्मान प्रेरणेचा या उपक्रमात दर्यापूर तालुक्यातून पहिला क्रमांक मिळवून 21,000/हजार रुपयाचे पहिले बक्षीस मिळवले.


तोंगलाबाद गावातील सर्व विद्यार्थी गावीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दर्जेदार शिक्षण घेतात. विशेष म्हणजे मागील वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय शैलेश नवाल साहेब यांनी कोरोना काळात शिक्षक मित्र उपक्रम ला भेट देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून लेखन साहित्य भेट दिले.
शाळेत परसबाग, गांडूळ खत निर्मिती, विद्यार्थ्यांची बचत बँक, परस बाग, संस्कृतिक कार्यक्रम, फुलबाग, महिलांसाठी मेळावे, गावातील महिलांसाठी हळदीकुंकू रक्षाबंधन, विद्यार्थ्यांसाठी धुलीवंदन, सामूहिक वनभोजन, शालेय उपयुक्त भांडार, विद्यार्थ्यांचे वाढदिवस, जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा

उपक्रमांमध्ये मार्गदर्शन, पालक मेळावे, शिकू आनंदे उपक्रमा अंतर्गत अनेक उपक्रम घेण्यात येतात, विद्यार्थ्यांच्या अनेक सुप्त गुणांना वाव दिल्या जातो. या सर्व कार्याची दखल घेऊन माननीय ,आदरणीय श्री बच्चुभाऊ कडू राज्यमंत्री शालेय शिक्षणात महाराष्ट्र राज्य यांनी व माजी आमदार वैज्ञानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री तुकाराम जी बिडकर साहेब यांनी श्री गणेश रावजी जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी जिल्हा वाशिम, अकोला यांचे आई वडील स्वर्गीय ओंकारराव जाधव (बाप्पू) व स्वर्गीय इंदिराबाई जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ जाधव परिवारा कडून माननीय बच्चुभाऊ ना रुग्णसेवा व अपंगांची सेवा करण्यासाठी 51,000 हजार रुपयांचा चेक प्रदान करण्यात आला होता. मात्र बच्चु भाऊंनी तसे न करता गावातीलच जिल्ह्यात प्रगतिपथावर असलेली जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा तोंगलाबाद शाळेचे मुख्याध्यापक श्री नंदकिशोर रायबोले यांना स्वतः स्टेजवर बोलावून 51,000/हजार रुपयाचा प्रदान करण्यात आला. तसेच श्री बच्चुभाऊ कडू यांच्या मातोश्री स्वर्गीय इंदिराबाई कडू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 51,000 हजार रुपयाची देणगी शाळेच्या विकास कामाकरिता देण्याची घोषणाही केली.
पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाची महाराष्ट्र राज्यातील बाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री दत्तात्रय वारे गुरुजींची यांचा सुद्धा शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयोग व मदत घेतली जाईल त्याचा फायदा अमरावती जिल्ह्यातील खूप शाळांना होईल असे आश्वासन बच्चु भाऊंनी सदरहू प्रसंगी दिले. तोंगलाबाद वासीय ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर रायबोले, सहायक शिक्षिका, ग्रामसेवक, गावचे तलाठी यांचे खूप खूप अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

Previous articleसॉफ्ट बॉल बोगस प्रमाणपत्रा ची शाळा पोलिसांच्या दारी , “फारुक शेख यांनी केली पोलीस तक्रार”
Next articleआ. बांगर यांच्या तोंडाला काळे फासू.:-पॅन्थर डॉ. राजन माकणीकर
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.