Home जळगाव सॉफ्ट बॉल बोगस प्रमाणपत्रा ची शाळा पोलिसांच्या दारी , “फारुक शेख यांनी...

सॉफ्ट बॉल बोगस प्रमाणपत्रा ची शाळा पोलिसांच्या दारी , “फारुक शेख यांनी केली पोलीस तक्रार”

171
0

रावेर (शेख शरीफ)
मागील काही दिवसापासून तलवारबाजी सॉफ्टबॉल व इतर काही खेळातील बोगस प्रमाणपत्र मुळे जळगाव जिल्ह्याचे नाव क्रीडा क्षेत्रात व पोलीस विभागात बदनाम होत असल्याने जळगाव जिल्हा फूटबॉल असोसिएशनचे सचिव तथा विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी फारुक शेख अब्दुल्ला यांनी शुक्रवार रोजी जळगाव अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर अशी तीन पाणी तक्रार जिल्हा पेठ पोलीस स्टेशन जळगाव यांचे नावे दाखल केली असता पोलीस अधीक्षक यांनी त्वरित पोलीस निरीक्षक जिल्हापेठ यांना चौकशीचे आदेश दिले.

*तक्रारीचा सारांश*

महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष जळगाव चे लोकप्रिय आमदार गिरीश महाजन साहेब व सचिव डॉक्टर प्रदीप तळवलकर हे आहेत डॉक्टर तळवलकर यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांना १२ फेब्रुवारी रोजी २१ रोजी लेखी पत्र देऊन ८० खेळाडूंच्या व्हेरिफिकेशन मधून ३० खेळाडू हे पूर्णपणे बोगस असल्याचे लेखी अहवाल सादर केलेला आहे.

या ३० बोगस खेळाडू पैकी काहींना शासकीय नोकऱ्या मिळालेल्या आहेत. बोगस प्रमाणपत्र देणारे घेणारे व प्रमाणपत्राला व्हेरिफाय करणारे अधिकारीवर्ग यांच्या नाकर्तेपणा मुळे गुणी खेळाडूंचा नुकसान होत असून त्यांच्या या बोगसगिरी मुळे संपूर्ण क्रीडा क्षेत्र बदनाम होत असताना व डॉ तळवलकर यांच्या बोगस सह्या केलेल्या असतांना सुद्धा डॉ तळवलकर हे पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याने फारुक शेख यांनी स्वतः पुढाकार घेऊन लेखी तक्रार दाखल केली.
*भा द वी प्रमाणे कारवाई करा*
भारतीय दंड विधान कायदा मधील बोगस प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी अधिक अधिग्रहीत करणारे गुन्हेगार यांच्यावर व सर्व संबंधितांवर शासनाची दिशाभूल करून खोटे पुरावे देऊन, खोटे प्रमाणपत्र देणे किंवा स्वाक्षरीत करणे हा गुन्हा असताना त्यांनी जे अधिकथन विधित पुरावा म्हणून स्वीकार्य आहे, त्यात केलेले खोटे कथन माहित असून सुद्धा खरे म्हणून वापरलेले आहे ,खोटे दस्तऐवज बनविले, बनावटी करण केले, ठकवणूक करण्यासाठी बनावटी करण केले ते बनावट दस्तऐवज खरे म्हणून वापरले आहे म्हणून या सर्वांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊन चौकशीची मागणी केलेली आहे.

Previous articleजिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
Next articleमाननीय श्री बच्चुभाऊ कडू (राज्यमंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य) यांनी घेतली जि.प. प्राथमिक मराठी शाळा तोंगलाबाद शाळेची दखल
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.