
वाशिम:-जागतिक महिलादिनाच्या पुर्वसंध्येला मंगरुळपीर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार ऊघडकीस आला असुन अंदाजे चार ते पाच महिन्याचे अर्भक ग्राम पार्डी ताड येथे रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत फेकलेले असल्याचे समजले.डाॅक्टरची चमु आणी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणी याप्रकरणी चौकशीला सुरुवात केली आहे.सदर अर्भक हे पुरुष की स्ञी जातीचे हे पुढील फाॅरेन्सिक लॅबच्या अहवालावरुनच कळणार आहे.
दि.7 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला प्रा. आरोग्य केंद्र शेलुबाजार अंतर्गत उपकेंद्र पार्डी ताड येथे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.अरविंद भगत यांना आरोग्य सेविका पार्डी ताड यांनी फोनवरून 4:45 ला सांगितले की पार्डी ताड येथे एक मृत अर्भक रस्त्याचे कडेला फेकून दिले आहे.डाॅ.भगत यांनी स्वतः संबधित ठिकाणी सायंकाळी पाच वाजता भेट देऊन संबधित बाबतीत पोलिसांनाही माहीती करून पोलिस प्रशासनाच्या मदतीने मृत अर्भकास पुढील कार्यवाही करीता ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथे पाठविले.डॉ जाधव वैद्यकीय अधीक्षक यांचेशी याबाबत चर्चा केली असता संबधित मृत अर्भक हे चार ते पाच महिन्याचे असून आणि पुढील तपासणी करीता नागपूर फॉरेन्सिक लॅब येथे उद्या पाठविण्यात येईल असे सांगण्यात आले.मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम पार्डी ताड येथे आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका ,अंगणवाडी सेविका मदतनीस यांची सभा घेऊन संबधित गावातील प्रत्येक नोंदणी केलेल्या गरोदर मातांची माहिती घेण्याबाबत सूचित केले तसेच दोन दिवसात प्रसूती झालेल्या माताची माहिती घेणेबाबत आरोग्यविभागाकडुन सूचित केले.सदर चार ते पाच महिन्याचे मृतावस्थेतील अर्भक हे स्ञी जातीचे की पुरूष जातीचे हे फाॅरेन्सिक लॅबमधुन आलेल्या अहवालावरुन कळणार आहे.पोलिसांनीही याप्रकरणी सखोल चौकशी सुरु केली आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206











































