
दारव्हा (प्रतिनिधी):- तालुक्यातील पेकर्डा येथे प्रथमच दहा दिवशीय शिवजयंतीचे आयोजन छत्रपती क्रांती सेना (स्वप्नील कुलट पाटील अकोला) या सामाजिक संघटनेच्या आवाहानावरुन बिमोद विठ्ठलराव मुधाने बहुजन मुक्ती पार्टी माजी उमेदवार दारव्हा दिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ यांनी यांचे घरी करण्यात आले होते. दि.१९ फेब्रू ते २८ फेब्रू २०२२ पर्यंत दहा दिवशीय शिवजयंतीचे आयोजन हा यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील पेकर्डा येथील पहिलाच उपक्रम असावा त्यामुळे त्या दहा दिवसात बिमोद मुधाने यांनी शक्य तितक्या गावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजाचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी सोबत प्रशांत ठाणे सुद्धा होते. पाळोदी, कुंभारकिन्ही,पारधी तांडा गणेशपुर, याठिकाणी प्रबोधन केले तर अनेक ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती कार्यक्रमाला भेटी दिल्या.

पेकर्डा येथे दहा दिवशिय शिवजयंतीचा सांगता समारोह कार्यक्रम संपन्न झाला.त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातीतील प्रतिष्ठित व्यक्ती रमेश किसन झाडे उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून संजय देवराव राऊत (सरपंच ग्रा. पं.पेकर्डा) तर प्रमुख पाहुणे म्हणून उमेश माकोडे (तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष), डींगाबर मोहाडे (ग्रा.पं सदस्य पेकर्डा),प्रवीण ज्ञा. खोडे पाटील (सामाजिक कार्यकर्ते), नरेंद्र मा. गुघाने (सामाजिक कार्यकर्ते),गजानन शिवरकार, अजहर देशमुख उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिमोद मुधाने केले तर बोलतांना त्यांनी सांगितले की,छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली जयंती पुण्याच्या स्वार गेट येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी दहा दिवशिय जयंतीची सुरुवात केली होती. त्यानंतर छत्रपती क्रांती सेना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अकोला येथे सुद्धा गेल्या काही वर्षांपासून दहा दिवशीय जयंतीची सुरुवात करण्यात आली असून प्रथमच पेकर्डा येथे दहा दिवशीय जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उमेश माकोडे, प्रवीण खोडे, दिंगाबर मोहाडे, नरेंद्र गुघाने , संजय राऊत, यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी मार्गदर्शन केले तर त्यावेळी बिमोद मुधाने यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश किसन झाडे यांना संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन की हत्या हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.तर उपस्थित मान्यवरांनी पुढील वर्षी दहा दिवशीय शिवजयंती घरी न करता गावाच्या चौकात विचार प्रबोधनाचे कार्यक्रम घेवून साजरी करू असे सांगितले. यावेळी उपस्थितांचे आभार आरती मुधाने यांनी मानले.तर कार्यक्रमाला किसन मोहाडे,विठ्ठलराव मुधाने, अनुसया इंगळे,नील कांबळे,सम्यक मुधाने,जीवक मुधाने, अनित्य मुधाने,आदित्य मुधाने,अंजली मोहाडे,प्रीती मोहाडे,प्रिन्स इंगळे,गुंजन अवचार, चैताली कांबळे, सुबोध मुधाने, स्वयंम मुधाने,अनुष्का मुधाने, सुशांत मुधाने अनेकजण उपस्थित होते.











































