Home परभणी अतिरिक्त पाणी बाहेर पडल्याने रस्ता गेला वाहून, पाण्याचीही नासाडी

अतिरिक्त पाणी बाहेर पडल्याने रस्ता गेला वाहून, पाण्याचीही नासाडी

186

माजलगाव कालव्याच्या चारी नंबर 43 मधील प्रकार

गंगाखेड/ प्रतिनिधी

गंगाखेड तालुक्यातून पडेगाव शिवारातून जाणाऱ्या माजलगाव कालव्याच्या चारी नंबर 43 मधून अतिरिक्त पाणी आल्याने पडेगाव ते वडगाव जाणारा पांदन रस्ता वाहून गेला आहे. दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असून याकडे माजलगाव कालव्याच्या जलसिंचन शाखेतील अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत.

माजलगाव कालवा चारी नंबर 43 मध्ये कर्मचाऱ्यांकडून जास्तीचे पाणी सोडण्यात आले . त्यामुळे त्या चारीतून बाहेर पडणाऱ्या वेगवान पाण्याने हाहाकार माजवला असून सर्वे नंबर 107 व 108 मधील रस्ता वाहून गेला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून काही ठिकाणी चिखल झाला आहे. केवळ चारी मधून अतिरिक्त पाणी बाहेर पडल्याने या रस्त्याचे नुकसान झाले आहे . अगोदरच त्या रस्त्याने शेतकऱ्यांना वागण्यासाठी अडचणी असताना अचानक आलेल्या पाण्याने रस्ता आणखीनच खराब झाला आहे .मागील चार दिवसांपासून पाणी आले असून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. यासंदर्भात परिसरातील शेतकऱ्यांनी कालव्याची अधिकारी कर्मचारी यांना याबाबतची माहिती देऊनही आज पर्यंत रस्त्यावर वाहून जाणारे लाखो लिटर पाणी थाबवण्यात आलेले नाही.परीसरातील शेतकऱ्यांनी ही माहिती सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर घातली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार गोविंद यरमे, गटविकासअधिकारी अंकुश चव्हाण, यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली असून अतिरिक्त पाणी सोडून लाखो लिटर पाणी वाया घालणाऱ्या व रस्त्यांचे नुकसान करणार्‍या अधिकारी ठोंबरे व प्रेमसिंग सिसोदिया, सुरेंद्र वाठोरे या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर व परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.