Home मराठवाडा राजपूत युवक क्षत्रिय संघटनेचे वतीने खा.इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यासंदर्भात तक्रार अर्ज

राजपूत युवक क्षत्रिय संघटनेचे वतीने खा.इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यासंदर्भात तक्रार अर्ज

440

जालना – लक्ष्मण बिलोरे

हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या नावाचा पत्रामध्ये एकेरी उल्लेख करून समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या बद्दल तसेच हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या औरंगाबाद येथील कॅनॉट गार्डन या नियोजित जागेत पुतळा बसविण्यास विरोध केल्याबद्दल खासदार इम्तियाज जलील याच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात यावा असा तक्रार अर्ज राजपूत युवक क्षत्रिय संघटनेच्या वतीने शहागड पोलीस चौकी येथील पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे यांना देण्यात आला.

या निवेदनात म्हटले आहे की,हिंदू सूर्य महाराणा प्रताप हे हिंदू धर्माचे दैवत असून त्यांनी अकबर यांच्या विरोधात गुलामगिरी न पत्करता लढा दिला होता.मुगलांच्या त्रासापासून व अत्याचारापासून हिंदू धर्माचे संरक्षण केले आहे.त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ औरंगाबाद येथील कॅनॉट गार्डन या उद्यानात अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका येथे सर्वपक्षीय सदस्यांनी सार्वजनिक सभा घेऊन हा पुतळा मंजूर करून महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव पाठविला होता.

तसेच सदर कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने निधी पुरवण्यात आलेला असताना जाणीवपूर्वक व लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी महाराणा प्रताप यांचा पुतळा हा तिथे उभारू नये.यासाठी खा.इम्तियाज जलील याने उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना १९ जानेवारी २०२२ रोजी पत्र जा.क्र.एम.पी.औरंगाबाद क./वी/२०२२२/३०९५ लिहिले.

या पत्रामध्ये हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला असून सदरील निधी परत मागवण्याची मागणी केली आहे.त्यामुळे सर्व हिंदू धर्माच्या व राजपूत समाजाच्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे गैरअर्जदार हा संविधानिक पदावर असताना संविधानाविरुद्ध जाऊन समाजाच्या धार्मिक भावना दुखवल्यामुळे गैर अर्जदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा,असा तक्रार अर्ज शहागड येथील पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे यांना देण्यात आला.

या निवेदनावर अमोल ठाकूर,शुभम ठाकूर,सुरेशसिंग ठाकूर,दीपक ठाकूर,आर.व्ही.छल्लारे,अभिजीत खटके,किशोर चव्हाण,अनिकेत ठाकूर,अमोल ठाकूर,आशिष चव्हाण,बाळासाहेब गावडे,दीपक ठाकूर,अनिकेत खटके,धनराजसिंग ठाकूर,सरदारसिंग ठाकूर,लक्ष्मणसिग राजपूत,राजासिंह ठाकूर,लखनसिंग ठाकूर,गणेशसिंग राजपूत,ओम ठाकूर,सौरभ ठाकूर,संदीप ठाकूर,प्रदीप ठाकूर,अनिकेत ठाकूर,विशाल चव्हाण यांच्यासह अनेक समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या होत्या.