Home बुलडाणा आता वाशिममध्येही होणार अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी

आता वाशिममध्येही होणार अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी

151

बुलढाणा ( प्रतिनिधी ता.२४जानेवारी) कैलास राऊत – वाशीम येथील ग्रामीण पोलिस स्टेशन समोर लाईफ लाईन मल्टी स्पेशालिटी स्पेशालिस्ट रुग्णालयामध्ये वाशीम जिल्ह्यात प्रथमच भुतडा अँड उदगिरे हार्ट केयर सेंटर उघडण्यात आले.

असून याठिकाणी अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी सेंटरची सुविधा उपलब्ध झाल्याची माहिती संचालक डॉ.सौरभ भुतडा व डि.एफ.कार्डिओलाजिस्ट डॉ. प्रशांत उदगीरे यांनी दिली ग्रामीण व शहरी भागातील रुग्ण हदया संबंधित उपचारासाठी औरंगाबाद, शिर्डी ,जळगाव ,अहमदनगर ,पुणे , नागपूर, आदी ठिकाणी जायचे यामुळे रुग्णांच्या परिवाराला आर्थिक व मानसिक समस्येला सामोरे जावे लागत होते,या संपूर्ण बाबीचा विचार करून हार्ट केअर सेंटर सुरू केले आहे. या हार्ट केअर सेंटर मध्ये एम.जी.एम. हॉस्पिटल चे एच.ओ.डी व सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रशांत उदगिरे हे दर रविवारी सेवा देणार आहे त्यांनी आतापर्यंत दहा हजाराच्या वर रुग्णांची ऍन्जिओग्राफी व अँजिओप्लास्टी केली असून वाशीम येथे दोन महिन्यांमध्ये २०० रुग्णांची अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी केली आहे ,या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत ऍन्जिओग्राफी व अँजिओप्लास्टी क्स ची सोय केली आहे तरी परिसरातील जनतेने या संधीचा फायदा घ्यावा असे आव्हान वाशिम चे सुप्रसिद्ध हदयरोग तज्ञ डॉ. सौरभ भुतडा यांनी केले आहे.