Home विदर्भ Yavatmal – फुले-शाहू-आंबेडकर विचार परिषदेतर्फे नामांतर दिन साजरा..!

Yavatmal – फुले-शाहू-आंबेडकर विचार परिषदेतर्फे नामांतर दिन साजरा..!

27
0

यवतमाळ – स्थानिक यवतमाळ शहरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नामांतर दिन सोहळा साजरा करण्यात आला.

डॉ. भीमराव बाबासाहेब आंबेडकर म्हणजे वैचारिक क्रांती तील ज्वलंत वादळ. त्यांच्या वैचारिक क्रांतीची जगातील महान विकसित देशांमध्ये असलेल्या विश्वविद्यालयांनी दखल घेऊन त्यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरुन ठेवले आहे. परंतु भारतातील मराठमोळे प्रांत म्हणजे महाराष्ट्र. ज्या महाराष्ट्रात बाबासाहेबांनी मोठमोठ्या सामाजिक क्रांत्या केल्या नव्हे तर समस्त बहुजन समाजाला जागृत करण्याचं काम केलं. त्याच पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव एका छोट्याश्या विद्यापिठाला देण्यासाठी येथील प्रस्थापित मनुवाद्यांनी अतोनात धिंगाणे घातले व महाराष्ट्राला कलंकित केले.
27 जुलै 1978 महाराष्ट्राच्या विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव पारित झाला तशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली परंतु राज्यातील मनुवादी प्रवृत्तीच्या मेंदूत काही वेगळेच शिजत होते. त्यांना वाटत होते की, ऐका अस्पृष्या चे नाव मराठवाडा विद्यापीठाला कसे दिल्या जाऊ शकते? आणि तेथूनच लढा सुरू झाला. हा लढा पुढे 14 जानेवारी 1994 ला थांबला. तब्बल सोळा वर्षे चाललेला नामांतर लढा. या लढ्यात कित्येकांनी आपल्या शरीराचे अवयव गमावले तर कित्येकांनी आपली घरेदारे गमावली आणि काहींनी आपले प्राण सुद्धा गमविले त्यात प्रामुख्याने शहीद भीमवीर, नांदेड जिल्ह्यातील सुगाव येथील जनार्दन मावडे, पोचीराम कांबळे व त्यांचा मुलगा चंदर कांबळे, नागपूर येथील अविनाश डोंगरे, दिलीप रामटेके अब्दुल सत्तार, रोशन बोरकर आणि रतन मेंढे यांना याप्रसंगी अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. व फुले-शाहू-आंबेडकर विचार परिषदेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते उमेश मेश्राम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून नामांतर लढ्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रामुख्याने भिम टायगर युवा सेना जिल्हाध्यक्ष विजय धुळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे, पॅंथर वाणी, आंबेडकर नगर येथील कार्यकर्ते राहुल माने, रितेश मुन, अक्षय खोब्रागडे, सुनील पाईकराव, सुभाष मेश्राम, यादव रामटेके, बालू बेले, अमोल खोब्रागडे, विशाल तामगाडगे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.