Home विदर्भ वलगांव पोलीस कोठडीतील आत्महत्या प्रकरणी ठाणेदारासह तिघांवर गुन्हा दाखल.

वलगांव पोलीस कोठडीतील आत्महत्या प्रकरणी ठाणेदारासह तिघांवर गुन्हा दाखल.

94
0

मनिष गुडधे अमरावती.

अमरावती – अल्पवयीन युवतीवर बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची घटना वलगांव पोलीस ठाण्यात घडली होती. याप्रकरणात सीआयडीने दिलेल्या तक्रारीनंतर आज वलगांवचे तत्कालीन पोलीस निरीक्षक जाधव यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.वलगांव पोलीस ठाण्यात अरूण बाबाराव जवंजाळ (५०, रा. आष्टी) यांच्यावर अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २३ ऑगस्ट रोजी सदर गुन्हा दाखल करून जवंजाळ यास अटक करण्यात आली होती. दुपारी दोन वाजता त्यास अटक केल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. परंतु अरूण जवंजाळ याने पोलीस कोठडीदरम्यान आपल्या सदरच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली होती.यामुळे पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी व न्यायमूर्ती घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा करण्यात आला होता. सीआईडीने घटनेचा तपास पूर्ण केल्यानंतर सीआयडीच्या उपअधिक्षक दीप्ती ब्राम्हणे यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे.तक्रारीवरून वलगांव पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार गोरखनाथ रामनाथ जाधव (४५), पोलीस कर्मचारी सागर बालकृष्ण गोगटे (३५) व रामकृष्ण नामदेव चांगोले (४२) यांच्यावर वलगांव पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०६, ३३०, ३४, पोलीस निरीक्षक जाधव व सागर गोगटे यांच्यावर कलम ३ (२) (६) अनुसूचित जाती आणि अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.