Home विदर्भ राळेगाव येथे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा उपक्रम संपन्न

राळेगाव येथे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा उपक्रम संपन्न

141

यवतमाळ /  राळेगाव :– राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शासन आदेशानुसार जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा उपक्रम अंतर्गत दिनांक 3 जानेवारी ते 12 पर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळून शाळेमध्ये निबंध स्पर्धा, आरोग्य शिबिर,वेशभूषा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. दिनांक 12 रोजी राजमाता जिजाऊ, व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये यावेळी समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.यामध्ये न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सचिव अर्चनाताई धर्मे, सौ लताताई खांदवे, सौ मीनाक्षीताई वेट्टी, सौ स्मिताताई कानडजे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्रावर वैशाली चौधरी यांनी तर स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर कु. निलीमा गोंडे यांनी सविस्तर माहिती दिली तसेच यावेळी मंचकावरील सर्व सत्कारमूर्तीनी स्त्रियांच्या जीवनामध्ये सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे कार्य कसे प्रेरणादायी होते याविषयी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक मोहन देशमुख उपमुख्याध्यापक जितेंद्र जवादे पर्यवेक्षक विजय कचरे यावेळी मंचकावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ करुणा महाकुलकर , यांनी केले तर आभार प्रदर्शन मनीषा इखे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शाळेतील सर्व महिला शिक्षिका, शिक्षक यांनी यावेळी सहकार्य केले…