Home विदर्भ अनावश्यक खर्चाला बगल देत केला ‘स्वराली’ चा वाढदिवस साजरा.

अनावश्यक खर्चाला बगल देत केला ‘स्वराली’ चा वाढदिवस साजरा.

364

ढाणकी/प्रतिनिधी :-गोपाल गौरवाड

“अधिक धन होने से, दान नही होता है,
बडा हृदय होने से, दान होता हैI”

यवतमाळ –  या ओळींची प्रचिती आज ढाणकी शहरात प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली. ढाणकी येथील दातृत्वाचे धनी असलेले स्व. बापूराव जिल्हावार यांची संतती, ही संपत्ती पेक्षाही मोठी असल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे. स्वर्गीय बापूराव जिल्हावार यांचे चिरंजीव शरदचंद्र जिल्हावार यांनी, आपली नात कु. स्वराली स्वप्निल जिल्हावार हिच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला बगल देत, ढाणकी येथील प्रभाग क्रमांक ६ मधील महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता तीस हजार रुपये व श्री दत्त मंदिर टेंभेश्वर नगर करिता पाच हजार रुपये असे एकूण ३५ हजार रुपयांचे दान करून, एक आदर्श समाजासमोर उभा केला आहे.
जिथे अफाट संपत्ती असते तिथे मात्र दान करण्याची क्वचितच परंपरा असते. मात्र काही ठिकाणी अफाट संपत्ती सह विशाल हृदय असते तेव्हाच असे आदर्श उपक्रम पाहायला मिळतात. जिल्हावार कुटुंबीयांचे समस्त पंचक्रोशीत स्तुती करताना नागरिक दिसत आहेत.