Home सातारा मायणी परिसर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिलीप पुस्तके व उपाध्यक्षपदी नदीम शिकलगार यांची...

मायणी परिसर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिलीप पुस्तके व उपाध्यक्षपदी नदीम शिकलगार यांची निवड

416

मायणी 🙁 दि.२८) वार्ताहर

              मायणी परिसर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार, दै तरुण भारतचे दिलीप पुस्तके यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. दिलीप पुस्तके यांची पत्रकारितेतील प्रदीर्घ सेवा,जेष्ठत्वाचा सन्मान स्थानिक पत्रकारांकडून एकमुखाने करण्यात आला .याचबरोबर उपाध्यक्षपदी नदीम शिकलगार यांची निवड करणात आली.सदर बैठक गत कार्याध्यक्ष तानाजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
.  नूतन अध्यक्ष प्रा.दिलीप पुस्तके यांनी गेली ३२ वर्षे तरुण भारत या एकमेव वृत्तपत्रात मायणी विभाग प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिला . खटाव तालुक्याचे जेष्ठ पत्रकार स्व.एम. बी. देशमुख व एम. आर. शिंदे यांचे ते शिष्य होत.स्व. आमदार भाऊसाहेब गुदगे यांची ‘ उरमोडीचा भगीरथ ‘ ही मुलाखत विषेश गाजली होती. वयाच्या ६४व्या वर्षी त्यांनी बॅचलर ऑफ जर्नालिझम करून नूतन पत्रकारांपुढे आदर्श ठेवला आहे. त्यांच्या अध्यक्ष निवडीबद्दल सार्थ निवडीची प्रतिक्रिया भागातून व्यक्त होत आहे.
राजकीय ,सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा,शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आणि विविध ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या मायणी जि प गटात असणाऱ्या चितळी,कलेढोण,मायणी,पाचवड,विखळे या भागातील सर्वांगीण विषयांना वाचा फोडण्याचे काम येथील पत्रकार करीत असतात.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेच्या सेवेसाठी व पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी एकजुट होणे आवश्यक असल्याने यासाठी कार्यरत असणाऱ्या मायणी परिसर पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणी निवडीसाठी बैठक सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत मायणी येथे पार पडली. या वेळी नूतन कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी-दिलीप पुस्तके ,कार्याध्यक्षपदी पांडुरंग तारळेकर,उपाध्यक्षपदी- नदीम शिकलगार,सचिवपदी -मंगेश भिसे ,खजिनदारपदी दीपक नामदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या कार्यकारणीचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे.
 यावेळी बोलताना संघाचे नूतन अध्यक्ष मार्गदर्शक ,जेष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके म्हणाले , पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून समाजाचा आरसा आहे. निष्पक्ष पत्रकारीतेचा हा वारसा नवीन कार्यकारिणीने यापुढेही चालवावा. तसेच समाजावर अन्याय होणाऱ्या विषयांची वाचा फोडताना समाजाला न्याय मिळून देण्याचा प्रयत्न करावा.                        
मायणी जि प गटाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या या संघाच्या निवड बैठकीत आगामी वर्षात करावयाच्या सामाजिक कार्याची रूपरेषाबाबत चर्चा करण्यात आली.सर्व पत्रकार सदस्यांनी नूतन कार्यकारीणीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपाध्यक्ष नदीम शिकलगार यांनी सर्वांचे आभार मानले.