Home मुंबई ऍड बाळासाहेब आंबेडकरांविना ऐक्य अशक्य – रिपाई डेमोक्रॅटिक

ऍड बाळासाहेब आंबेडकरांविना ऐक्य अशक्य – रिपाई डेमोक्रॅटिक

83
0

मुंबई दि (प्रतिनिधी) बहुजन हृदय सम्राट ऍड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांविना रिपाई ऐक्य शक्य नसून त्यांच्या विना ऐक्याची भाषा करणाऱ्या व्यक्ती, वृत्ती आणि प्रवृत्ती चा जाहीर निषेध करत असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनीं व्यक्त केले.

आंबेडकरी विचारांची तोफ व स्वाभिमानाचा धगधडता ज्वालामुखी, आंबेडकरी रक्त व विचारांचे खरे वारसदार असणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विना रिपाई ऐक्याची भाषा करणाऱ्या प्रा. जोगेंद्र कवाडे सरांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

रिपाई चे सर्व विखुरलेले गट एकत्र करून सत्तेचे समीकरण बांधल्यास नक्कीच आंबेडकरी समुदाय राजकारण्यांच्या मुख्य प्रवाहात येईल शिवाय ऐक्य करून ऐक्याचे प्रमुखत्व माजी आमदार टी. एम. कांबळे यांचे सुपुत्र सन ऑफ पँथर तसेच अभ्यासू व तरुण तडफदार युवा नेतृव कनिष्क कांबळे यांना दिले तर नवीन बदल निश्चित घडेल असाही आशावाद विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केला.