Home विदर्भ समाधान दहातोंडे यांची सांस्कृतिक विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड.

समाधान दहातोंडे यांची सांस्कृतिक विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड.

488

धनराज खर्चान

अमरावती -: आज दि.२८/१२/२०२१ ला.अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस चा १३७ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
या स्थापना दिनाचे औचित्य साधून अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष तथा अमरावती जिल्हा परिषद चे अध्यक्ष, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक अनिरुद्ध ऊर्फ बबलु देशमुख यांनी .समाधानजी दहातोंडे यांची अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देवून गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. यावेळी अनिरुद्ध देशमुख (अध्यक्ष जि.प.अमरावती) हरिभाऊ मोहोड (प्रदेश सचिव, काँग्रेस कमिटी) प्रकाश काळबांडे (संचालक, अमरावती मध्यवर्ती सहकारी बँक) ,बाळासाहेब हिंगणीकर (अर्थ व आरोग्य सभापती जि.प.अमरावती),संजय मार्डीकर ,प्रदीप देशमुख(सेवादल अध्यक्ष)संजय लायदे, प्रवीण काशीकर,सतीश धोंडे, अभिजित देवके, भगवंत खाडे तसेच काँग्रेस बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.