Home विदर्भ गाडीचा दोर तुटल्याने कापुस रस्त्यावर पसारा, पिपरी गावाजवळची घटना,शेतकऱ्यांचे नुकसान

गाडीचा दोर तुटल्याने कापुस रस्त्यावर पसारा, पिपरी गावाजवळची घटना,शेतकऱ्यांचे नुकसान

285

प्रतिनिधी-प्रमोद झिले येरला 

वर्धा –  हिंगणघाट मार्केटला कापूस विक्री करिता नेत आतांना गाडीचा दोर तुटल्याने कापसाचा रस्त्यावर पसारा झाला. ही घटना नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरील पिपरी गावाजवळ 29 डिसेंबर रोजी पहाटे घडली. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

हिंगणघाट तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरील पिपरी जवळ 29 डिसेंबरच्या पहाटे हैदराबाद कडून नागपूर कडे टेम्पो क्रमांक T S 16 U81110 कापूस घेऊन जात असताना चालत्या गाडीत दोर तुटल्याने कापूस खाली कोसळला रोडवर जवळपास 13 किटल कापूसाचा रस्त्यावर पसारा झाला.रस्त्यावर तीन ठिकाणी कापूसाचा सडा पडला. यावेळी चालकाचे लक्ष जाताच गाडी थांबवून रस्ता बंद करून कापूस गोळा करण्यात आला.,यावेळी पिपंरी येथील नागरिकांच्या मदतीने कापूस गोळा करण्यात आला.यावेळी काही काळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.