
गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांचा आरोप
यवतमाळ प्रतिनिधी:- लोकशाही दिनी गुरुदेव युवा संघाच्या वतीने शहरात होणाऱ्या विविध समस्येविषयी तक्रारी देण्यात आल्या. मागील महिन्यात सुद्धा गोरगरिबांना उद्भवणारे 72 समस्येविषयी लोकशाही दिनी तक्रारी गुरुदेव संघाच्या वतीने देण्यात आल्या होत्या. मात्र दोन महिना लोटूनही प्रशासनाने अद्यापही तक्रारी निकाली काढला नाही. गोरगरिबांच्या समस्याकडे यवतमाळचे जिल्हाधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाच्या वतीने करण्यात आला आहे.
सर्व सामान्य जनतेला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. लोकशाही दिन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात येते आहे. आज लोकशाही दिनी जिल्हाधिकारी यांना शहरात उद्भवणाऱ्या अनेक अडचणी सोडविण्यात याव्यात अशी मागणी गुरुदेव युवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र यवतमाळचे जिल्हाधिकारी या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे. प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या अनेक योजना कागदावरच आहे. सध्या जिल्ह्यात विविध आजाराने थैमान घातले आहे. शासकीय रुग्णालयातील अधिष्ठाता यांचे कोणतेही नियोजन नाही. प्रधानमंत्री आवास योजनेच्या 3556 लोकांचे अर्ज मंत्रालयात धूळ खात पडून आहे. नगरपरिषद व तहसील कार्यालयामार्फत दिव्यांगांना देण्यात येणारे मानधन हे चार ते पाच महिने लुटून गेल्यावर सुद्धा मिळत नाही. त्यामुळे दिव्यांग चकरा मारुन त्रस्त झाले आहे.
शहरालगत असलेल्या कापरा पारधी बेड्यावर अजून पर्यंत प्रशासनातील एकही व्यक्ती पोचलेला नाही. येथील पारधी बेढ्यावर वरील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहेत. सत्तर वर्षापासून झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे पट्टे मिळाले नाही. शेतकरी किसान पेन्शन योजने पासून जिल्ह्यातील शेतकरी वंचित आहे. अशा विविध जनतेच्या समस्येविषयी आज लोकशाही दिनी गुरुदेव युवा संघाच्या वतीने प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी अशी मागणी करण्यात आली. शेतकरी, विधवा, दिव्यांग, निराधार, आज पीडित कुटुंब अशा अनेक समस्या लोकशाही दिनी गुरुदेव युवा संघाच्या वतीने मांडण्यात आल्या. मागील दोन महिन्यापूर्वी गुरुदेव युवा संघाच्या वतीने लोकशाही दिनी गोरगरिबांच्या 72 समस्या मांडण्यात आल्या मात्र दोन महिने लोटले तरी गरिबांच्या समस्याकडे जिल्हाधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे.
लोकशाही दिनाला गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम,मंदा मानकर,दशरथ बावणे, संध्या पराते, लता कावरे,हर्षदीप पाटील इत्यादी उपस्थित होते.
Post Views: 422










































