
जुनी पेंशन च्या मागणीकरिता शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी एकवटले.

आजचा संघर्ष उद्याच्या म्हातरपणाची काठी होणार ;
” एकच मिशन जुनी पेंशन चा नारा “
अमरावती – रविवार दि.५ डिसेंबर २०२१ ला सकाळी ठीक १०:०० वा. श्री.संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे जुनी पेंशन च्या मागणीकरिता भव्य पेंशन सभा आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन बंद करून तिला पर्याय म्हणून राज्य सरकारची डि. सी.पी.एस. व एन. पी.एस. योजना सुरू केली.या नवीन पेंशन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातील रक्कम बाजारात विविध कंपन्यामध्ये गुंतवून त्यातून कर्मचाऱ्यांना पेंशन देण्याचे धोरण होते. मात्र मागील सोळा वर्षातील या डी. सी.पी.एस./एन.पी.एस.योजनेचे स्वरूप बघता ही योजना फसवी असून त्यातून कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन प्रमाणे निवृत्तीवेतन मिळतांना दिसत नाही.ज्यामुळे मागील सोळा वर्षात निवृत्त तसेच मयत झालेले असंख्य कर्मचारी व त्यांचे परिवार कोणत्याही पेंशन पासून वंचित असून,त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.शासनाच्या सेवेसाठी आपले पूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशी वेळ येणे, ही बाब निंदणीय आहे.
त्यामूळे १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजनेचे सर्व लाभ पूर्ववत लागू करावे, जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी या पेंशन संघर्ष यात्रेच्या निमित्ताने करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर जुनी पेंशन संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे राज्य संयोजक वितेश खांडेकर,अमरावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार सुलभा खोडके,सुनील दुधे,आशुतोष चौधरी,शेखर भोयर, संगीता शिंदे,गोकुलदास राऊत,संजय भेले, सुनील केने,किरण पाटील,उमेश गोदे,प्राजक्त झावरे पाटील,मधुकर काठोळे,पंकज गुल्हाने,नामदेव मेटांगे,मिलिंद सोळंके, गोविंद उगले,शैलेश राऊत,अतुल कडू,दीपिका एरंडे, रामदास इंगळे,उपस्थित होते.
२२ नोव्हेंबर २०२१ पासून निघालेली ही भव्य पेंशन यात्रा रविवारी अमरावती मध्ये दाखल झाली. राज्यातील २५ जिल्ह्यातून ही यात्रा अमरावती आली असता, पेंशन यात्रेचे सकाळी १० वाजता बडनेरा येथे आगमन होताच जुनी पेंशन संघर्ष समनव्य समिती अमरावती द्वारा स्वागत करण्यात आले.त्यानंतर ही यात्रा राजापेठ मार्गे सांस्कृतिक भवन येथे पोहोचली. यावेळी पेंशन संघर्ष सभा घेण्यात आली.सभेला अमरावती जिल्ह्यातील सर्व विभागातील सहकारी, निमसरकारी कर्मचारी उपस्थित होते.
*पेंशन संघर्ष यात्रेचे प्रास्तविक गौरव काळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र दहातोंडे व प्रजक्ता राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन आशिष ढवळे सरांनी केले.
प्रतिनिधी -: धनराज खर्चान










































