Home विदर्भ ST महामंडळाच्या शासनात विलीनिकरण च्या मागणीसाठी मनसेचा आक्रोश मोर्चा…. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला…..!

ST महामंडळाच्या शासनात विलीनिकरण च्या मागणीसाठी मनसेचा आक्रोश मोर्चा…. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला…..!

564

महा विकास आघाडी सरकारचा निषेध करत… विलीनीकरणाच्या मागणीसाठी मनसेची प्रचंड नारेबाजी…..

यवतमाळ शहराचा परिसर हजारो मनसैनिकांच्या नारेबाजी नी दुमदुमला…..

यवतमाळ – संपूर्ण महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.त्या पार्श्वभमीवर यवतमाळ जिल्हा मनसेच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार , मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नेतृत्त्वात आज रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा आक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते.एसटी महामंडळाचे आणि कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय , त्यांची पत्नी , मुले, आणि आप्तस्वकीय आणि मनसेचे जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व सामान्य जनतेच्या जीवाची काळजी घेणाऱ्या आणि तूटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र निर्माण सेनेने रोखठोक भूमिका घेत आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. मोर्चाला सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यानंतर यवतमाळ शहरातल्या प्रमुख मार्गावर मार्गक्रमण करीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चामध्ये जिल्ह्यातील मनसेचे कार्यकर्ते आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आप्तस्वकीयांच्या मोठ्या प्रमाणात समावेश होता. शासनाचा निषेध व्यक्त करत मोर्चा दरम्यान प्रचंड नारेबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी मोर्चाला संबोधित करताना मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांनी शासनाच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करत महाराष्ट्र निर्माण सेनेने लोकशाही मार्गाने आज मोर्चा च्या स्वरूपात आपला निषेध आणि भूमिका व्यक्त करत येणाऱ्या काळात जर सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या न सोडविल्यास आणि शासनामध्ये यांचे विलिनीकरण न केल्यास यापुढे महाराष्ट्र निर्माण सेना आक्रमक भूमिका घेत मनसे च्या पद्धतीने आंदोलन उभारेल असा इशारा या प्रसंगी बोलताना अनिल हमदापुरे यांनी दिला. मोर्चा दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा आपल्या भावनाआवाहन व्यक्त करत शासनाने एसटी एसटी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या मोर्चात प्रमुख्याने मनसेचे देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, साजिद अब्दुल शेख, ॲड अमित बदनोरे, विकास पवार, डेव्हिड शहाने, , सादिक शेख,सचिन येलगंधेवार, शंकर वरघट,,संदीप लांडे,आकाश राहाटे गजानन खांदवे,बाळासाहेब कठाले , कपिल ठाकरे, सुनील तायडे, संजय बिजोरे ,प्रवीण कनवाळे, यासह एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात येत आहे.