
अयनुद्दीन सोलंकी,
घाटंजी / यवतमाळ – कौटुंबिक व प्रशासकीय जबाबदारी सांभाळून सुद्धा युपीएससी परीक्षेमध्ये देशांमध्ये आर्णी तालुक्याचा नांव लौकिक करणाऱ्या स्नेहल ढोके चा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असं सूचक वक्तव्य माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी केले.

सुबोध शिक्षण प्रसारक मंडळ व ग्रामपंचायत केळझरा यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार व जानकाबाई नामदेवराव भगत यांच्या 90 व्या वर्षपूर्ती सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मातोश्री जानकाबाई भगत यांच्या कार्याचा गौरव करून शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात सदर कुटुंबियांनी जे कार्य केले ते कौतुकास्पद आहे. मी सामाजिक न्याय मंत्री असताना महाराष्ट्र राज्यात 353 तालुक्यात शंभर निवासी शाळा उभारण्याचे काम माझ्याकडून झाले असून त्याचं मोघे साहेबांचा सुद्धा हातभार लागलेला आहे. अविनाश भगत हा माझा सच्चा सहकारी असून राजकीय क्षेत्रात जितेंद्र मोघे यांनी त्याला सोबत घ्यावे असे सुद्धा हंडोरे यांनी या प्रसंगी म्हणाले.
प्रसंगी स्नेहल ढोके यांचा सत्कार उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तर जानकाबाई यांच्या वाढ दिवसा निमित्त सर्व भगत परिवार व आप्तस्वकीय या सर्वांनी मिळून विशेष सत्कार केला. दर्शन दुगड, बंकेश पवार व दीक्षा भवरे यांच्या प्रतिनिधींना सुद्धा शाल, श्रीफळ व भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेची प्रत देऊन येथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री अँड. शिवाजीराव मोघे हे होते. यावेळी बाळासाहेब मांगुळकर, जिल्हा परिषद सदस्या स्वाती येंडे, बाळासाहेब शिंदे, नागपूरचे नगरसेवक मनोज सागोळे, भिमशक्तीचे दिलीप भोजराज, भभिमशक्तीचे विदर्भ अध्यक्ष पंकज मेश्राम, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस जितेंद्र मोघे, सौ. किरण मोघे, मीनाताई ढोके, मानसशास्त्र तज्ञ महानाग रत्न, भिमशक्तीचे अँड. यशवंत मेश्राम, भिमशक्तीचे एन. के. कांबळे, पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण, नागपूरचे विजय मेश्राम, पांढरकवडा येथील शिवाजीराव मोघे महाविद्यालयाचे सचिव विजय मोघे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, राजूभाऊ निकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी अँड. शिवाजीराव मोघे यांनी जानकाबाई नामदेवराव भगत व स्नेहल अविनाश भगत यांच्या कार्याची प्रशंसा करून किशोर भगत परिवाराने राबवलेल्या सामाजिक कार्याचा त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला. ते आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. पारवा येथील ठाणेदार विनोद चव्हाण यांनी जानकाबाई भगत यांच्या प्रती सादर केलेल्या “माझे हात, हातात तुझ्या आई, मी चालतो, ठाई ठाई, अशीच तुझी थाप असुदे पाठीवरी आई, मी सर्व जग जिंकेल ठाई ठाई” ह्या ओळीला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. स्नेहल ढोके यांचा यांचे स्वागत माझ्याकडून ,(ठाणेदार विनोद चव्हाण) केल्यामुळे अत्यानंद झाल्याचे सांगून अनेक कार्यक्रमांना आम्हाला फक्त समोरच उभे राहावे लागते. मात्र, आज भगत कुटुंबीयांनी मला हा सन्मान दिल्यामुळे ठाणेदार चव्हाण यांनी भगत कुटुंबियाचे या वेळी शतशः आभार मानले. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील जनतेने प्रचंड गर्दी केली होती. त्यात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या नागपूर येथील राजेश बुरबुरे म्युझिकल शो ने उपस्थितांची मने जिंकली. तर माळेगांव येथील सुनील चव्हाण यांनी पुरुष व महिलांच्या आवाजात गीत सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुबोध शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर भगत यांनी केले, तर संचालन मनोहर चांदेकर, सूनील वेले यांनी केले. आभार जयश्री भगत यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुबोध शिक्षण प्रसारक मंडळ, ग्रामपंचायत केळझरा तसेच नेहरू विद्यालय केळझरा, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येरंडगाव व शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय घाटंजी च्या कर्मचाऱ्यांनी योग्य असे सहकार्य केले.










































