Home विदर्भ सुशिक्षित बेरोजगार युवक व पुरुषांकरिता निःशुल्क Tally With GST चे प्रशिक्षण

सुशिक्षित बेरोजगार युवक व पुरुषांकरिता निःशुल्क Tally With GST चे प्रशिक्षण

402

यवतमाळ (प्रतिनिधी) तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवति करिता प्रशिक्षण जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र(MCED) यवतमाळ आयोजित यवतमाळ येथे एक महिना कालावधीचे निःशुल्क Tally With GST चे प्रशिक्षण दिले जाईल.करिता यवतमाळ तालुक्यातील युवक व युवतिनी या संधीचा लाभ घ्यावा.प्रशिक्षणार्थीचे शिक्षण कमीत कमी दहावि पास ते पुढे असावे.जात प्रवर्ग :- सर्वसाधारण(GENERAl), वयोमर्यादा १८ ते ४५ सोबत लागणारे कागदपत्रे १) टी.सी.(शाळा सोडल्याचा दाखला)२) मार्कसिट ३)आधार कार्ड ४) बँक पासबुक झेरॉक्स प्रत ५) दोन फोटो आवेदन स्विकारण्याची अंतिम तारीख 07/12/2021राहील.प्रशिक्षणार्थीची निवड मुलाखती व्दारे करण्यात येईल तसेच प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येईल.अधिक माहितिकारिता MCED कार्यालय उद्योग भवन येथे संपर्क साधावा .

यवतमाळ तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतिनी निःशुल्क Tally प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मा.रुपेश हिरुळकर साहेब प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यवतमाळ यांनी केले आहे.