Home पश्चिम महाराष्ट्र पोलीस मित्र परिवार समन्वय समिती पुणे विभागाच्या वतिने महिला पोलीस रणरागिणींना सम्मानित

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती पुणे विभागाच्या वतिने महिला पोलीस रणरागिणींना सम्मानित

212

पुणे – पोलीस मित्र परीवार समन्वय समिती पोलीस विभागातील कर्मचांऱ्यांचे मनोबल वाढेल असे विविध प्रकारचे उपक्रम संस्थापक/अध्यक्ष मा.डाॅ.संघपाल उमरे,विनोद पञे महाराष्ट्र राज्य सचिव,व मा.सुभाषदादा सोळंके महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण महाराष्ट्र भर राबविल्या जात आहे.

याचेच औचित्य साधुन पश्चिम महाराष्ट्र महिला प्रमुख मा.माधुरी गुजराथी मॅडम,पश्चिम महाराष्ट्र कार्यध्यक्षा मा.सौ.आरती सोनाग्रा मॅडम,मा.शशिकांत शिंदे,पुणे जिल्हा प्रमुख ज्योती व-हाडी मॅडम,पुणे जिल्हा अध्यक्ष नरेश कांबळे सर,अॅड.ज्योती विरकर मॅडम व पुणे विभागातील सर्व पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या पदधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत व पोलीस मिञ परिवार समन्वय समिती पुणे विभागाच्या वतिने प्रसंगी स्वत:ची व कुंटुबियांची जबाबदारी बाजुला सारुन समाजाच्या जबाबदारीला प्रथम प्राधान्य देऊन सतत १२ ते १६ तास जिवाची पर्वा न करता आपले प्रत्यक्ष कर्तव्य बजावणाऱ्या आजच्या महिला पोलीस.अश्या २१ महिला पोलीस नवदुर्गा,रणरागिणींना पोलीस मिञ परिवार समन्वय समिती च्या वतिने सन्मानपञ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

पोलीस मित्र परीवार समन्वय समितीची माहीती,ध्येय-धोरणाविषयी,समितीची नियमावली विषयी कार्य पध्दती विषयी,विशाखा समिती विषयी सखोल माहिती मा.गुजराथी मॅडमनी सर्व पोलीस विभागास दिली.याप्रसंगी वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर स्वरुपातील गुन्हाच्या व महिलांच्या अन्याय व अत्याचारा संदर्भात व गुन्हाबाबत आपण आम्हाला मदत करा असे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत आव्हान केले.व लवकरच सर्व खासगी कंपनीत आपल्या समितीच्या पदधिकाऱ्यांचे फोन नंबर व पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचाऱ्यांच्या फोन नंबरची माहीती दर्शनी भागत लावण्या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.सदर उपक्रमाचे नियोजन व आयोजन सौ.आरतीताई सोनोग्रा यांनी व पोलीस मिञ परिवार समन्वय समिती च्या पदधिकाऱ्यांनी केले.विमानतळ पोलीस स्टेशन येथिल पोलीस विभागांतील अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी समितीने राबवलेल्या या उपक्रमाचे आभार मानले व कैतुक केले.परिसरातील नागिरिकांन कडुनही समितीच्या पदधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.