मराठवाडा

निलेश चाळक यांच्या प्रयत्नांना यश आठ महीण्यापासून प्रलंबित निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्याच्या पगारी बँकेत जमा

Advertisements

बीड , दि. २५ :- बीड तालूक्यातील श्रावणबाळ व संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्याच्या बँक खात्यावर आठ ते दहा महीण्यापासून पगारीचे पैसे टाकण्यात आलेले नाहीत त्यामुळे बीड तालूक्यातील श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यावर कुंटूबाचा उदारनिर्वाह भागविण्यासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ शकते जर एखाद्या लाभार्थ्याने कर्ज घेतले आणि वेळेवर नाही फेडल्यास आणि भविष्यात लाभार्थ्याच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर होऊ शकतो आणि जर भविष्यात असा प्रंसग आलाच तर यांची सर्वसव जबाबदारी आपल्या प्रशासनावर राहील अशी तक्रार बीड येथील समाजिक कार्यकर्ते निलेश चाळक यांनी जिल्हाधिकार्याकडे केली.

या तक्रारीची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने आणि तहसिल कार्यालय बीड यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत सोमवार पासून बँकेत श्रावणबाळ व निराधाराच्या पगारी बँकेत जमा करण्यास सुरूवात आली आहे व तसेच समाजिक कार्यकर्ते निलेश चाळक यांनी जिल्हाधिकार्याना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि जिल्हा प्रशासनान श्रावणबाळ सजंय गाधी योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यावर पगार टाकण्याचा कालावधी निश्चित करून यासंबधी जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात माहीती दर्शक फलक लावण्यात यावा अशी मागणी ही केली आहे.

You may also like

मराठवाडा

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना –  जिल्ह्यात ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...