Home जळगाव बोदवडला कडकडीत बंद , “बंदला महाविकस आघाडीचा पाठींबा”

बोदवडला कडकडीत बंद , “बंदला महाविकस आघाडीचा पाठींबा”

142

शरीफ शेख

रावेर , दि. २५ :- जळगाव जिल्ह्यातील
बोदवड येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी दि.२४ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.केंद्र सरकारने लादलेले कायदे,नागरीकत्व सुधारणा कायदा,संशोधन कायदा,राष्ट्रीय नागरिक नोंदणी,एन.पी.आर.ह्या कायद्याच्या विरुद्ध बंद चे अँड.प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले होते.यावेळी बोदवडला कडकडीत बंद पाळण्यात आला.त्यास व्यापारी संघटना,दुकानदार संघटना व समस्त बोदवड वासियांनी पाठिंबा देत स्वयंस्फुतीचे दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला.

यावेळी काँग्रेसचे नगरसेवक डॉ. सुधीर पाटील,दिलीप पाटील विनोद मायकर,शे.महेबूब शे चांद,राष्ट्रवादीचे प्रमोद धामोडे,आनंदा पाटील,शिवसेनेचे कलीम शेख,शेतकरी शेत मजूर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील,संभाजी ब्रिगेड चे संजय पाटील,अनंता वाघ,जमिया तुल-मा -ए हिंद चे मौलाना अमीन इशाती यांचे सह शेकडो मुस्लिम समाजातील तरुण या बंद मध्ये सहभागी झाले होते.
बंद यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे बोदवड तालुक्यातील सुपडा निकम,महेंद्र सुरळकर,शेख सलीम शेख खलील,गोपीचंद सुरवाडे,विनोद पाडर नागसेन सुरळकर,सुरेश तायडे,गोविंदा तायडे,शाहरुख शहा,सद्दाम कुरेशी,मौलवी अमीन,बबलू हाफिज,महेमुद शेख,आक्रम शेख,बबन बोदडे, सुभाष इंगळे,जितेंद्र सूर्यवंशी,शांताराम मोरे,संजय गायकवाड,राजुभाई मकेनिक,रफा कुरेशी,सह बोदवड शहर तथा बोदवड ग्रामीण भागातील असंख्य बहुजन समाजातील,विविध सामाजिक तथा राजकीय क्षेत्रातील पदाधिका-यांनी पाठींबा दिला तर बंद च्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.