Home राष्ट्रीय नवी दिल्लीत 71 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या आदिवासी कलाकार एनसीसी...

नवी दिल्लीत 71 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या आदिवासी कलाकार एनसीसी कॅडेटस, एनएसएस स्वयंसेवक आणि चित्ररथ कलाकारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साधला संवाद..

39
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नवी दिल्ली , दि. २५ :- उपस्थित उत्साही समूदायाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, प्रजासत्ताक दिन संचलनात छोट्या भारताचे दर्शन घडवणार आहे. संचलनात ते सादर करणार असलेल्या कार्यक्रमातून जगाला भारताचे वैविध्य पहायला मिळेल. भारत हा केवळ भौगोलिक किंवा लोकसांख्यिक देश नाही, असे पंतप्रधान म्हणाले. भारत ही एक जीवनशैली आहे. एक भारत, श्रेष्ठ भारत बाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, भारत हा केवळ 130 कोटी लोकांचा देश नाही तर वैभवशाली परंपरा असलेला देखील देश आहे, हे कायम स्मरणात ठेवायला हवे.

यहां आप जितने भी साथी एकत्र हुए हैं, आप एक प्रकार से Mini India- New India को showcase करने वाले लोग हैं। भारत असल में क्या है, ये हमारा देश और पूरी दुनिया आपके माध्यम से समझती है: PM @narendramodi pic.twitter.com/SAIzXmDvKT

— PMO India (@PMOIndia) January 24, 2020

जब हम एक भारत, श्रेष्ठ भारत की बात करते हैं, तो हमें ये भी याद रखना है कि भारत असल में है क्या। भारत क्या सिर्फ सरहदों के भीतर 130 करोड़ लोगों का घर भर ही है? नहीं, भारत एक राष्ट्र के साथ-साथ एक जीवंत परंपरा है, एक विचार है, एक संस्कार है, एक विस्तार है: PM @narendramodi pic.twitter.com/bEZeiIZrsH

— PMO India (@PMOIndia) January 24, 2020

भारत हा अनेक तत्वज्ञान आणि समृद्ध, जागतिक आणि सार्वत्रिक दृष्टीकोनाचा संगम आहे, असे ते म्हणाले. भारत म्हणजे एक जागतिक कुटूंब आहे, सर्व धर्मांसाठी येथे समानता आहे. भारत म्हणजे सत्याचा विजय आहे, भारत म्हणजे एकच सत्य विविध मार्गातून जाणून घेण्याची कल्पना आहे. भारत हा निसर्ग संसाधनांचे रक्षण करणारा देश आहे, भारत हा स्वयंपूर्ण आहे, प्रत्येकाच्या कल्याणात विश्वास असणारा भारत हा देश आहे. स्त्रींची पूजा करणारा हा भारत देश आहे. सोन्यापेक्षाही मातृभूमी ज्याच्यासाठी अमूल्य असणाऱ्यांचा हा देश आहे. भारताचे सामर्थ्य हे भौगोलिक आणि सामाजिक बंधामधील वैविध्यात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी भारताची तुलना फुलांच्या तोरणाशी केली, ज्यामध्ये विविध फुलं भारतीयत्वाच्या समान धाग्यांच्या माध्यमातून एकत्र गुंतलेली आहे. भारताचा एकतेमध्ये विश्वास आहे, एकरूपतेवर नाही, असे त्यांनी नमूद केले. एकतेचा हा धागा मजबूत करणे आणि त्याचे जतन करणे हा आपला सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. नव भारताच्या दिशेने वाटचाल करताना कुणीही व्यक्ती आणि कुठलाही धर्म मागे राहणार नाही हे पाहण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या मूलभूत कर्तव्यांना महत्व देण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपण जर आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडली तर आपल्या हक्कांसाठी लढण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

यहां जितने भी युवा साथी आए हैं, मेरा आपसे आग्रह रहेगा कि राष्ट्र के प्रति अपने कर्तव्यों की ज्यादा से ज्यादा चर्चा करें। चर्चा ही नहीं, बल्कि खुद अमल करके, उदाहरण पेश करें। हमारे ऐसे ही प्रयास न्यू इंडिया का निर्माण करेंगे: PM @narendramodi pic.twitter.com/rvxAfggq1W

— PMO India (@PMOIndia) January 24, 2020

यावेळी आदिवासी कलाकार, एनसीसी कॅडेटस, एनएसएस स्वयंसेवक आणि चित्ररथ कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमालाही पंतप्रधान उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting