
IG श्री शेखर पाटील यांनी केले मिटकेंच्या धाडशी शौर्याचे कौतुक..!
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया – बालाजी सिलमवार
नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री संदीप मिटके यांनी सिंघम चित्रपटातील प्रसंगलाही लाजवेल अशा घडलेल्या घटनेत स्वतच्या जीवाची पर्वा न करता ओलीस ठेवलेल्या कुटुंबाची अतिशय प्रसंगावधान राखून सुटका केली या धाडसी कारवाईचे कौतुक आज रोजी नाशिक परिक्षेत्राचे IG श्री. B.G.शेखर यांनी केले.
काल दि.७ ऑक्टोबर गुरुवार रोजी सकाळी डीग्रस येथे पीडित महिला,त्यांचे पती मुलगा व मुलगी हे त्यांचे राहते घरी असताना त्यांचा मुलगा सकाळी कचरा टाकण्यासाठी मागील दरवाजाने बाहेर गेला असता तेथे दबा धरून बसलेल्या आरोपी नामे सुनील लोखंडे यांने मागील दरवाजाने घरात प्रवेश केला व पीडित महिला यांच्या मुलाच्या कमरेला बंदूक लावून मागोमाग घरात आला व त्याने आई कोठे आहेतिला बाहेर बोलाव असे म्हणून आरडाओरड करू लागला.
सदर ओरडण्याचा आवाज आल्याने पीडित महिला यांनी खिडकीतून बाहेर डोकावून बघितले असता आरोपी पुण्यातील बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे याने यापूर्वी खंडणीसाठी धमकवल्याची फिर्याद या महिलेने दिली होती ती मागे घेण्यासाठी त्याने हा नियोजनबध्द गुन्हा केला.
त्यांचे मुलास रिव्हॉल्वर लावून त्यास घरातील बेडरूमकडे घेऊन येत असताना दिसल्याने त्यांनी बेडरुमचा दरवाजा आतून लॉक केला.
आरोपीने पीडित महिलेस बाहेर येण्यासाठी सांगून.त्यांच्या मुलीच्या दिशेने एक गोळी फायर केली सदर गोळी तिचा भाऊ याचे काना जवळून गेली गण मधून गोळी फायर झाल्यानंतरही पीडित महिला यांनी दरवाजा उघडला नाही हे बघून आरोपीने मी आता गॅस सिलेंडरच्या टाकीला गोळी मारून स्फोट घडवून आणतो,तू बाहेर ये मी तुला गोळी घालतो तू जर बाहेर आली नाही तर मी तुझ्या मुलांना व पतीला गोळ्या घालीन असे आरोपी म्हणाला.
सदर वेळी पीडित महिला यांनी येथील कर्त्यव्यदक्ष पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना सदर घटनेबाबत माहिती दिली
व तात्काळ पोलीस मदत मिळण्यासाठी विनंती केली.यावेळ क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळावर तात्काळ पोहोचून मिटके साहेब यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदरची परिस्थिती अतिशय समयसूचकता दर्शवित अत्यंत कौशल्याने हाताळीत आरोपीला शरण येण्यासाठी सांगून आरोपीशी संयमाने चर्चा चालू ठेवली.
परंतु आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संदीप मिटके यांनी त्याला वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना बोलणे करून देतो म्हणून बोलण्यात गुंतवून त्याचे मतपरिवर्तन केले त्या एका क्षणी तो आरोपी बेसावध झाला ही संधी साधून “ओलीस ठेवलेल्या मुलीस सोड वाटल्यास पिस्तुल माझे डोक्यावर ठेव”
असे सांगून त्या बेसावध क्षणाची ही संधी साधून मिटके यांनी मुलीला दूर होण्यास खुणावत धाडसाने आरोपीच्या अंगावर झडप घेऊन पिस्तुलाचा बॅरल पकडला व आरोपीस खाली दाबले.
त्यावेळी आरोपीने एक गोळी फायर केली परंतु मिटके यांनी पिस्तुलाच्या बॅरल गच्च पकडून जमिनीचे दिशेने ठेवल्याने गोळी संदीप मिटके यांचे डाव्या पायाच्या पॅन्टला घासून गेली तेवढ्यात तेथे उपस्थित असलेल्या पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे आणि पथकाने संदीप मिटके यांचे मदतीस येऊन आरोपी जेरबंद करून त्यास ताब्यात घेतले.आरोपीची पद्धत ही दहशतवादी अवलंबतात तशी या आरोपीची पद्धत असल्याने सुटकेसाठी मुंबईहून फोर्स वन ला पाठविण्याचा निर्णय वरिष्ठांकडून झाला होता परंतु तोपर्यंत नगरच्या पोलिसांनी ऑपरेशन यशस्वी केले.
सदरची कारवाई अतिशय संयमाने ओलीस ठेवलेल्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोलीस खात्याची मान आदराने उंचावेल अशी कामगिरी केल्याने I.G.श्री B.G.शेखर पाटील यांनी Dy.S.P.संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक केले.यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.यावेळी श्री संदीप मिटके यांच्या सारख्या खाकीची इमान राखणार्या प्रत्येक पोलिसांची छाती ३६ उंचीची झाल्याचं पाहायला मिळाले.यापूर्वीही श्री मिटके यांचे अनेक कार्य पोलीस विभागाची प्रतिमा उंचवणारीच अशीच आहे.









































