सिंदखेडराजा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था ,
अमीन शाह ,
बुलडाणा
गेल्या दोन वर्षा पासून र्सिदखेडराजा मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून साखरखेर्डा ते सेंदुर्जन मलकापूर पांगरा दुसरबीड हा रोड अत्यन्त खराब झाला असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजणे ही मुश्किल झाले आहे वाहन धारकांना या रस्त्यावर तारेवर ची कसरत करावी लागत आहे या रस्त्यावर रोज किरकोळ अपघात सुरू असून मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही मिळालेल्या माहिती नुसार गेल्या दोन वर्षा पासून लव्हाळा ते दुसरबीड या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही या रस्त्यावर दुरुस्ती न करताच दोन ठिकाणी रस्ता दुरुस्ती केल्याचे मोठे फलक लावण्यात आले आहेत गेल्या महिन्यातच याच मार्गावर साखरखेर्डा येथील पेट्रोल पम्पा समोर कोळश्याने भरलेला एक ट्रक खराब रस्त्या मूळे रस्त्याच्या मधो मध फसला होता विशेष उल्लेखनीय म्हणजे त्याच दिवशी मतदार संघाचे आमदार नामदार आदरणीय मंत्री महोदय हे साखरखेरड्यातच होते त्यांनी ही हे दृश्य पाहिले असेल किंवा नसेल मात्र काही दिवसांनी फक्त तो एकच खड्डा मुरूम टाकून तात्पुरता बुजविण्यात आला खामगाव येथून जालना जाण्यासाठी हा मध्य मार्ग असून नेहमीच या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते गेल्या अनेक दिवसा पासून सत्तधार पाऊस सुरू असून पावसा मुळे ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे , साहेब राज्याचा विकास करता करता कधी वेळ काढून आमच्या खेड्यातील रस्ता पाणी वीज या छोट्याश्या लहानश्या समस्यांकडे ही पहा हो ??? असा प्रश्न सिंदखेडराजा तालुक्यातील सामान्य मतदार लोक करीत आहे ,
https://youtube.com/shorts/o19PGNe41Ss?feature=share