Home विदर्भ पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवर – बेलोरा वन येथील आरोपींकडून घातक शस्त्र...

पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवर – बेलोरा वन येथील आरोपींकडून घातक शस्त्र जप्त..!

660

➡️ पारवा पोलीसांची कारवाई..?

अयनुद्दीन सोलंकी,
———————————
घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवर – बेलोरा वन येथे बजरंग बली मंदीराच्या चौकात एक ईसम हातात धारदार शस्त्र घेऊन असल्याची गोपनिय माहिती सावळी – सदोबा बिटचे जमादार गजानन शेजुळकर, पोलीस नायक हेंमतसिंग राठोड यांना मिळाली.

त्यावरुन जमादार शेजुळकर, पोलीस नायक राठोड यांनी अधिक चौकशी केली असता, त्यांना दिनेश मोतीराम पेंदोर (वय – 28) हा लोखंडी सुरा – सत्तुर घेऊन असल्याचे आढळले. या वरून आरोपी दिनेश पेंदोर विरुद्ध अवैध शस्त्र बाळगणे, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे अशा आरोपावरून शस्त्र कायदा कलम 4/25 व महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 अन्वये पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करुन आरोपीता कडून लोखंडी सुरा – सत्तुर जप्त केला आहे.
———————————-
🔵 पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सावळी – सदोबा परिक्षेत्रात 42 गांवे असून या भागात घातक शस्त्रे, अवैद्य हत्यार, पिस्तुल, रिव्हाल्वर ईत्यादी घातला शस्त्रे आढळल्यास वा माहीती असल्यास कृपया पारवा पोलीस स्टेशन किंवा सावळी – सदोबा परिक्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक दिपक राणे, जमादार गजानन शेजुळकर, पोलीस नायक हेंमतसिंग राठोड यांना कळवावे. तसेच माहीती देणार्‍या ईसमाचे नांव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी केले आहे.

विनोद चव्हाण,
ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक, पारवा ता. घाटंजी