Home नांदेड माहूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार,जय भीम, जय मिम चा नारा देत अनेकांचा...

माहूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार,जय भीम, जय मिम चा नारा देत अनेकांचा एमआयएममध्ये प्रवेश !

220

मजहर शेख, नांदेड

नांदेड/माहूर,दि : ७ :- माहूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला धक्का देत अनेक कार्यकर्त्यांनी जय भीम, जय मिम चा नारा देत अनेक कार्यकर्त्यांनी एआयएमआयएम पक्षाचे राष्ट्रीय नेते खा.असदुद्दिन ओवेसी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी तथा मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला, जिल्हाध्यक्ष अमजद मिर्झा बेग, माहूर तालुकाध्यक्ष सिराज रजा यांचे नेतृत्वाखाली एमआयएम पक्षात प्रवेश केला.
माहूर नगरपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने सर्वच राजकीय पक्षाची मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून दि.०६ सप्टेंबर रोजी माहूर तालुका एमआयएमची महत्वपूर्ण बैठक माहूर येथे संपन्न झाली. या बैठकीस माहूर तालुकाध्यक्ष सिराज रजा, एमआयएम नगरसेविका प्रतिनिधी अजीज शेख, उपाध्यक्ष शेख अल्लाबक्ष, सचिव अरमान पठाण, शेख मुसाभाई जहागीरदार, सय्यद जाहिरोद्दिन भाई शेरअली भाई, शेख चांदभाई, इर्शाद रजा, शेख इसाक, शेख मोहीन, मुस्तफाभाई, शेख मुस्तकिन, सय्यद साद, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एमआयएम सभासद नोंदणीची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी माहूर शहरातील मुस्लीम नागरिकांना गेल्या १५ वर्षापासून शादीखाना उभारून देण्यासह विविध आश्वासने देऊनही आजतागायत कोणतेही आश्वासन पूर्ण केले नसल्याचा रोष व्यक्त करीत सय्यद मोहसीन, सय्यद अजरोद्दिन, फेरोजभाई पठाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अनेक मुस्लीम कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत यांनी शेकडो कार्यकर्त्यासह एमआयएम प्राथमिक सभासद नोंदणीचे फॉर्म भरून तालुकाध्यक्ष सिराज रजा यांच्याकडे सुपूर्द केले. यामुळे माहूर शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले असून आगामी नगरपंचायत, जि.प. प.स. निवडणुकीच्या अनुषंगाने हा राष्ट्रवादी पक्षासाठी हा जब्बर धक्का मानला जात आहे. शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी सोडून एमआयएम मध्ये प्रवेश केल्याने अनेक वार्डाची समीकरणे बदलणार असून एमआयएमच्या जागा वाढणार असल्याचे राजकीय जाणकार मत व्यक्त करीत आहेत.