
जालना- लक्ष्मण बिलोरे
आज अधिकृत गोर सेनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जालना समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.नवी मुंबई विमानतळास हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे सलग साडेअकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले मा.वसंतराव नाईक यांचे नांव देण्यात यावे.मा.वसंतराव नाईक यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अत्यंत कठोर निर्णय घेऊन नवी मुंबई हे शहर वसविले आहे.शहरामध्ये औद्योगिक विकास झपाट्याने व्हावा म्हणून औद्योगिक विकास महामंडळाला भरघोस निधी देवून विकास कामाला गती दिली.मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून भविष्यात हे शहर देशाचे केंद्रबिंदू होणार या दृष्टीने मुंबईचा कायापालट करण्याचे काम त्यांनी केले.जागतिक स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे शहर बनवण्यामध्ये मा.वसंतराव नाईक यांचा सिंहाचा वाटा आहे.हे कोणीही नाकारू शकत नाही.शिवाय हरीत क्रांतीचे स्वप्न पाहताना शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी व वीज मुबलक प्रमाणात मिळावी म्हणून जायकवाडी,उजनी,अप्पर वैनगंगा व पेंच इत्यादी पाण्याचे प्रकल्प व कोराडी,पारस,परळी,खापरखेडा,पोफळी व भुसावळ असे विद्युत प्रकल्प उभारले.महाराष्ट्रात हरित क्रांती करून महाराष्ट्राला देशात एक नंबर वर आणले.हे महाराष्ट्र कधीच विसरु शकत नाही.आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हरितक्रांतीचे प्रणेते सलग साडे अकरा वर्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहून महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळून देशात महाराष्ट्र राज्याचा गौरव करणाऱ्या महामानवाचे नाव नवी मुंबई विमानतळाला शोभेल व तमाम महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजुरांचे व सामान्य जनतेचे स्वप्न साकार होईल.म्हणून नवी मुंबई विमानतळाला मा.वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी लाक्षणिक उपोषनात गोर सेना प्रदेश अध्यक्ष नामदेव भाऊ पवार व जिल्हा अध्यक्ष शाम राठोड यांच्या कडून करण्यात आली आहे.उपोषण कर्ते-नामदेव पवार-प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य,पंडित राठोड-महराष्ट्र संयोजक,शाम राठोड-जिल्हा अध्यक्ष,विजय राठोड जिल्हा सहसचिव,मधुकर पवार जि.सहसंयोजक,अमोल राठोड ता.अध्यक्ष जालना,विठ्ठल राठोड ता.संयोजक बदनापुर,सचिन पवार ता.अध्यक्ष बदनापुर,सुरेश पवार ता.उपाध्यक्ष बदनापुर,रामेश्वर राठोड ता.सचिव बदनापूर,राजकुमार चव्हाण सटवाई तांडा,विजय राठोड सामाजिक पत्रकार जालना,देविदास चव्हाण बदनापूर तसेच महिला यावेळी
उपस्थित होते.











































