Home पश्चिम महाराष्ट्र डॉ. प्रशांत खांडे यांना राज्यस्तरीय कुशल नेतृत्व “जननायक लोकगौरव” पुरस्कार 

डॉ. प्रशांत खांडे यांना राज्यस्तरीय कुशल नेतृत्व “जननायक लोकगौरव” पुरस्कार 

632

पुणे : मनुष्यबळ लोकसेवा विकास ट्रस्ट यांच्या तर्फे देण्यात येणारा ” राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार ” 2021 हा या वर्षीचा पुरस्कार डॉ प्रशांत खांडे यांना 25 ऑगस्ट 2021 रोजी प्रदान करण्यात आला . डॉ प्रशांत खांडे हे मागील 20 पेक्षा अधिक वर्षापासून सामाजिक कार्यात कार्य करीत आहेत . त्यांनी आपल्या सामाजिक जीवनाचा प्रवास इंजीनीरिंग कॉलेज मध्ये तिस – या वर्षाला असताना राजीवजी दिक्षित यांच्या सोबत स्वदेशी बचाओ आंदोलन पासून सुरू केला . तसे लहान वयापासूनच सामाजिक क्षेत्रात काम आणि नेतृत्व गुण असल्यामुळे टिम कोप्टन , क्लास मॉनिटर ते कॉलेज मध्ये प्रेसिडेन्ट ऑफ मॅनेजमेंट असोसिएशन कमिटी अश्या संधि मिळाल्या . त्या नंतर त्यांनी कॉलेज जीवनातच प्रोग्रेसिव यूथ क्लब ची स्थापना करून सामाजिक कार्यात सहभाग वाढवला . त्यांनी आता पर्यन्त आण्णा आंदोलन , बेटी बचाव आंदोलन , विविध सामाजिक संस्थांना मदत कार्य , ग्रामीण भागात युवकांना मोफत करियर आणि व्यवसाय मार्गदर्शन तसेच सामाजिक उद्योजकता आणि सामाजिक नोकरी मेळावा हे त्यांनी सर्व प्रथम महाराष्ट्रात सुरू केले . याची नोंद विविध प्रसार माध्यमांनी घेतली आहे . असे उद्गार कृष्णजी जगदाळे अध्यक्ष मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांनी काढले . डॉ प्रशांत खांडे यांनी लिहलेली 3 पुस्तके पण हिन्दी , मराठी आणि इंग्लिश भाषेत प्रकाशित झालेली आहेत . त्या पुस्तकांतून त्यांनी नवे देशासाठी नेतृत्व कसे निर्माण होईल याचा विचार समोर मांडले आहेत . ते अखिल रयतसेवक क्रांतिकारी संघ आणि रयत सेवक एजुकेशनल अँड मल्टीपर्पज सोसायटी या दोन संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात , तसेच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ऑल इंडिया पेरेंट्स स्टूडेंट्स अँड टीचर असोसिएशन चे काम सांभाळत आहेत . मागील 2 वर्षापासून ते स्पार्टबन सोशल वर्कर्स फेडेरेशन ऑफ इंडिया याचे चेयरमन म्हणून काम बघत आहेत आणि त्यांचा नेतृत्वात फेडेरेशन तर्फे राज्यस्तरीय सरपंच परिषद , राज्यस्तरीय पाणी परिषद , राज्यसस्तरीय पालक बालक परिषद आणि राज्यस्तरीय बचत गट परिषद असे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले . या सामाजिक उपक्रमाला पद्मश्री अवॉर्ड विजेत आणि राज्यमंत्री , केंद्रीय मंत्री यांनी उपस्थिती देऊन मार्गदर्शन केले . त्यांचा अशा कुशल नेतृत्व गुणामुळे त्यांना “ कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . हा पुरस्कार शासनाच्या आदेशानुसार ऑनलाइन पद्धतीने 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी संस्थेतर्फे घेण्यात आला . त्यांना आधी लीडर अवॉर्ड 2015 झी टीव्ही असोसिएशन , एमआरसी 24 लीडर अवॉर्ड 2016 , विवेकानंद युवारत्न पुरस्कार 2018 , यंग अचिवर अवॉर्ड 2020 , नेलडा सन्मान 2018 , महापालक तर्फे सन्मान 2019 , पुणे कट्टा सन्मान , अशा ब – याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे . त्यांनी मिळालेला पुरस्कार त्यांच्या सोबत काम करणा- या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना समर्पित केला आहे