मराठवाडा

वाहनाच्या तिहेरी अपघातात एक ठार एक गंभीर जखमी!!

Advertisements

खानापूर फाट्या नजीकची घटना…

देगलूर , दि. २३ :- मालवाहू ट्रक व बोलेरो पिकप वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बोलेरो वाहनाच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर मालवाहू वाहनाच्या चालक यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे ही घटना खानापूर फाट्यावर गुरुवारी तारीख 23 रोजी सकाळी दहा ते अकरा च्या दरम्यान घडली.

अपघातावेळी रस्त्यावर एक पाण्याची वाहतूक करणारा ऑटो थांबून होता त्यामुळे या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
देगलूर -नांदेड या हायवे रोडवर वरील खानापूर फाट्यानजीक असलेल्या झिरो फाट्यावर मालवाहू ट्रक क्रमांक एम.एच.04-जे.के.7124 हे वाहण हैदराबाद वरून नांदेड कडे जात होते तर बोलेरो पिकप क्रमांक एम एच 26- 34 47 हे वाहन नांदेड हुन देगलूर कडे भर वेगात येत होते तर याच रस्त्यावर आटो क्रमांक 88 54 थांबून होते त्यामुळे या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात बोलेरो वाहनाचे इंजन 20 फूट लांब जाऊन पडले या थरारक झालेल्या अपघातात बोलेरो चा चालक माधव धोंडीबा रा.माळ कौन,नांदेड हा जागीच ठार झाला तर मालवाहू ट्रकचा चालक गजानन गंगाधर डोईफोडे हा मात्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर देगलूरच्याउप जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले परंतू प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला तुरंत नांदेडला उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .
ही थरारक घटना गुरुवारी(23 )रोजी सकाळी दहा ते अकरा च्या दरम्यान हैदराबाद अकोला या हायवे वर घडली घटना घडल्याचे काहीकाळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती काही वेळानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केले.रस्त्यात थांबलेल्या ऑटोच्या चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले .
याप्रकरणी देगलूर पोलिस स्थानकात अपघाताची नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला.

You may also like

मराठवाडा

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना –  जिल्ह्यात ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...