Home विदर्भ कारंजाचा अन्नदाता, दररोज महामार्ग क्र ६ वरुन जानार्या अँम्ब्युलन्सच्या चालकासाठी मोफत जेवण.

कारंजाचा अन्नदाता, दररोज महामार्ग क्र ६ वरुन जानार्या अँम्ब्युलन्सच्या चालकासाठी मोफत जेवण.

334

इकबाल शेख

प्रहार जनशक्ति पक्ष चे चंदन महिले यांचा एक अनोखा उपक्रम.

महिले परीवारामुळे उपाशीपोटी झोपणाऱ्या रुग्णाना मिळतात चार घास

वर्धा / कारंजा घाडगे : कोरोनाच्या संचार बंदी काळात व लॉकडाऊनमुळे अनेक रुग्णांना अनेकांना अन्नासाठी वणवण करावे लागत होते. हे पाहून प्रहारचे चंदन महिले यांनी गरजूंना मदतीचा एक हात या उपक्रमाखाली कारंजा शहरातील ग्रामिण रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना दोन वेळचा डब्यांची सोय करुन दिली, आणि ही व्यवस्था शेवट
पर्यंत रुग्णांना देणारे आहे।

तसेच अमरावती नागपुर महामार्ग क्र. ६ वरुन जानार्या कोनत्याहि अँम्ब्युलन्सच्या चालक व सहकारी साठी कारंजा घाडगे ले बाई वर असलेल्या हाटेल “खुशि” येथे मोफत जेवण देण्याचा उपक्रम सुरू केल्यामुळे अनेक गरीब, गरजूंच्या पोटात रोज चार घास जावू लागले आहेत.

कोरोनामुळे अनुभवलेल्या या बिकटकाळात प्रत्येकाने माणुसकी जपायला हवी. वेगवेगळ्या परीस्थितीत अनेकजण उपाशीपोटी झोपत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यासाठी काही करावे ह्या भावनेतून गरजूंना मदतीचा एक हात हा उपक्रम सुरू केला असून गावात कोणीहि रुग्ण उपाशी राहू नये यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. दररोज दहा ते पंधरा व्यक्तिंच्या जेवणाची सोय करित आहे. चंदन महिले मो.७७९८९३९६६६ / ७७९८९०२६६६