Home जळगाव मुलगी पसंत पडली म्हणून घरची मंडळी बघायला आली व मुलीस वधू बनवून...

मुलगी पसंत पडली म्हणून घरची मंडळी बघायला आली व मुलीस वधू बनवून घेऊन गेले

198

पहुर व जळगांव शहर मनीयार बिरदारीचा स्तुत्य उपक्रम

रावेर (शेख शरीफ)

जळगाव शहरातील मनियार वाडा येथील सय्यद इस्माइल हाजी मुसा यांची मुलगी मीसबाह ला पहूर येथील भिकन मानियार हे मागील आठवड्यात बघायला आले त्यांना मुलगी पसंत पडली म्हणून सोमवारी मुलगा शोएब आपल्या आई, बहिण व इतर नातेवाईकांसोबत बघायला आला असता त्याला व इतर नातेवाईकांना सुद्धा मुलगी पसंत पडली म्हणून त्यांनी नाते करण्यास होकार दिला.

जिल्हा बिरादरीचे उपाध्यक्ष तथा शहर अध्यक्ष सय्यद चांद यांच्या निदर्शनास ही बाब आली असता त्यांनी वरा कडील मंडळीला प्रस्ताव दिला की जर तुम्हा सर्वांना मुलगी पसंत पडली व आपण जवळचे नातेवाईक आहोत तर चांगल्या कार्यात वेळ ,पैसा व आरोग्य धोक्यात न आणता आजच आपण निकाह (लग्न) करण्यास काय हरकत आहे? त्यावर पहूर ची मंडळी नी धुळे चे शकील सैयद,नेरी चे शोएब सय्यद, पहुर चे हुजेफ भिकन सय्यद,यांनी विचार केला व दूरध्वनीद्वारे आपल्या काही नातेवाईकांशी चर्चा केली आणि सकाळी १२ वाजता निकाह ला होकार दिला.लागलीच तयारी सुरू झाली वरा कडील काही नातेवाईक संध्याकाळ पर्यंत जळगाव मध्ये दाखल झाले व सोमवारी संध्याकाळी सहा वाजता जामा मसाजिद मरकज जळगाव येथे हा निकाह पार पडला.

*मौलाना उस्मान कासमी यांचे प्रवचन व दुवा ने विवाह स्मपन्न*

पवित्र कुराणाचे व अंतिम प्रेषितांचे काही दाखले मौलाना कासमी यांनी उपस्थित समोर सादर केले आणि अशाच स्वरूपाचे लग्न अंतिम प्रेषितांना अभिप्रेत असल्याचे सांगून त्यांनी खुतब ए निकाह सादर करून निकाह(लग्न) लावले.

*निकाह चे वकील व गवाह*

वकिलाची भूमिका वधु चे मोठे काका सैयद इब्राहिम जळगाव तर साक्षीदारांची( गवाह ) ची भूमिका जळगाव चे शेख रफिक रमजान व नेरी चे मोहम्मद इम्रान यांनी पार पाडली.

*विवाहासाठी यांचे प्रयत्न व उपस्थिती होती*

जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, उपाध्यक्ष तथा शहराध्यक्ष सय्यद चाँद, संचालक अब्दुल रऊफ अब्दुल रहीम, सलीम मोहम्मद, ताहेर शेख, अनिस शेख, शेख अमीर, साजिद अमीर, सय्यद साबीर , आरिफ मुसा, सय्यद सलीम ,सय्यद रशीद ,पहूर येथील शेख दगडू शेख रज्जाक ,शकील सय्यद ,ताहेर मणियार, सय्यद सय्यद रेहमत आदींची उपस्थिती होती.