
मजुर मजुरी पासुन वंचित
केली आर्थिक मागणी
तहसीलदारांकडे तक्रार
देवानंद जाधव
यवतमाळ – दिग्रस तालुक्यातील लोणी (सायखेडा) ते लिंगी (वाई) या मार्गावर नुकतेच दोन्ही बाजुंनी वृक्षारोपण करण्यात आले. जी.प.बांधकाम ऊपविभाग आर्णी या यंञने अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात आली. आणि सदर वृक्ष लागवडीचे काम महीला पुरुष मजुर वर्गा कडुन करण्यात आले. माञ वृक्ष लागवड झाल्यानंतरही मजुरांना मजुरी पासुन वंचित ठेवण्याचे पाप स्थानिक रोजगार सेवक कैलास लक्ष्मण ईंगोले यांनी केले. मजुरांचे हजेरी पञक भरुन सही करण्यासाठी रोजगार सेवकाने आर्थिक मागणी केल्याची तक्रार संदीप सुभाष जिजोरे रा.लोणी (सायखेडा)या मजुराने दिग्रस तहसीलदारांकडे केली आहे. त्या अनुषंगाने तहसीलदारांनी वादग्रस्त रोजगार सेवकाकडुन स्पष्टीकरण मागीतले आहे.
कैलास लक्ष्मण ईंगोले हा रोजगार सेवक म्हणून कार्यरत असतानाही त्याने स्वत: ला मजुर नियमबाह्य पणे हजारो रुपयाची ऊचल केली आहे. शिवाय मृतकाच्या नावे हजेरी पञक भरुन या रोजगार सेवकाने शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे. ख-या मजुरांना मजुरी देण्यासाठी एक लाख रुपयाची मागणी रोजगार सेवकाने केल्याची तक्रार आहे. हातावर आणुन पानावर खाणा-या मजुरांना आपल्या मजुरी पासुन वंचित ठेवणा-या, कैलास लक्ष्मण ईंगोले या रोजगार सेवकाला बडतर्फ करुन फौजदारी कारवाई करण्याची मागणी संदीप सुभाष जिजोरे आणी ईतर मजुरांनी तहसीलदार दिग्रस यांचे कडे निवेदनातुन केली आहे. रोजगार सेवकावर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा ईशारा मजुरांनी दिला आहे. तहसीलदारांनी या प्रकरणी सदर रोजगार सेवकाला स्पष्टीकरण मागुन त्याचे कान टोचल्याने मजुर वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. मजुरांना घामाचे दाम मिळावे अशी माफक अपेक्षा वृक्ष लागवड करणा-या असंख्य मजुरांची आहे. तहसीलदार काय कारवाई करतात याकडे लोणी (सायखेडा) गावातील मजुरांचे लक्ष लागले आहे.










































