Home परभणी मोहर्रम मार्गदर्शक सूचनेमधील चूक सुधारली…!

मोहर्रम मार्गदर्शक सूचनेमधील चूक सुधारली…!

653

पालम/प्रतीनीधी

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मोहर्रम साजरा करण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने काढलेल्या मार्गदर्शन पत्रकात ‘क़त्ल की रात’ हा शब्द आल्यामुळे मुस्लिम समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली होती. सदरिल बाब लक्षात घेऊन एम आय एम पक्षाने आक्षेप घेतला परभणी,पालम व विविध ठिकाणी निवेदन दिले तसेच परभणी एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय इम्तियाज खान व सर्व परभणी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केल्यानंतर त्यांनी तातडीने पत्रकातील व मुस्लिम समाजाच्या भावना कळविल्या.व पालम येथील एम.आय.एमचे प्रभारी अनीस भाई खुरेशी यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले होते यानंतर महाराष्ट्र सरकार कडून तातडीने हालचाली होऊन HMO Maharashtra ने शुद्धिपत्रक काढले असून त्यात ‘कत्ल की रात’ ऐवजी ‘शहादत की रात’ असे वाचावे, असे नमूद केले आहे.