Home रायगड महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि टायगर ग्रुपच्या वतीने तळीये मध्ये जीवनावश्यक किटचे वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि टायगर ग्रुपच्या वतीने तळीये मध्ये जीवनावश्यक किटचे वाटप

212

महाड – प्रतिनिधी

तळीयेमधील नागरिकांना गेली कांही दिवस अनेक संस्था आणि शासकीय मदतीचा ओघ सुरु आहे. टायगर ग्रुपचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सुरज सोनवने यांनी त्यांच्या हस्ते या जीवनावश्यक कीटचे प्रत्येक दरडग्रस्तांच्या कुटुंबियांना वाटप करून त्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे.

तळीये दुर्घटनेत एकाच वाडीतील ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांचे पुनर्वसन सुरु आहे. शिवाय येथील अन्य वाड्यांना देखील स्थलांतर करण्यात आले आहे. यामुळे याठिकाणी नागरिकांना संस्था आणि शासकीय मदत हा मोठा आधार ठरत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई आणि टायगर ग्रुप च्या माध्यमातून दरडग्रस्त तळीये गावात जीवनावश्यक सामानाचे कीट वाटप करण्यात आले. एक ट्रक माल याठिकाणी वाटप करण्यात आला असून टायगर ग्रुपचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सुरज सोनवणे, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तळीये गावात जावून जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. यावेळी तेथील ग्रामस्थांनी सुरज सोनवणे यांचे आभार मानले.

यावेळी टायगर ग्रुपचे अभय जाधव, जग्ग्दिश शिंदे, केशव कस्तुरे, राजू शेट्टी, अभय गायकवाड, सुमित पवार, मोहम्मद शेख, इरफान सोलकर, दिनेश परदेशी, आदींनी कपडे, भांडी, पाणी, अन्नधान्य आदी वाटप करण्यात मोलाचे काम केले.