Home नांदेड रामगड किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवा अन्यथा राष्ट्रध्वज अवमान याचिकेस सामोरे जा नगरसेवक इलियास...

रामगड किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवा अन्यथा राष्ट्रध्वज अवमान याचिकेस सामोरे जा नगरसेवक इलियास बावाणी यांचा इशारा.

582

मजहर शेख, नांदेड

नांदेड/माहूर,दि : ४ :- नांदेड जिल्ह्या सह महाराष्ट्र भर देशात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माहूर गडावरील रामगड किल्ल्याच्या दर्शनी भागावर देश स्वतंत्र झाल्यापासून राष्ट्रीय ध्वज फडकविला जात होता सुमारे सात ते आठ वर्षापूर्वी काही समाजकंटकांनी रामगड किल्ल्याची व राष्ट्र ध्वज फडकविला जाता असलेल्या जागेची नाश धुस केली होती त्यानंतर पाठपुरावा करून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी रायगड किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी भरीव निधी दिला होता त्यातून रामगड किल्ला व राष्ट्रध्वज फडकविण्याच्या जागेची दुरुस्ती करण्यात आली या ठिकाणी पुरवीसारखा राष्ट्रध्वज फडकवावा अशी मागणी गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसचे नगरसेवक इलियास बावाणी यांनी करूनही अध्याप येथे राष्ट्रध्वज फडकविला गेला नाही येत्या 15 आगस्ट रोजी रामगड किल्याच्या दर्शनी भागावर राष्ट्रध्वज फडकविला न गेल्यास राष्ट्रध्वज अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती नगरसेवक इलियास बावाणी यांनी दिली आहे.


रामगड किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्र सह देश विदेशातून भाविक पर्यटक माहुरगढावर येतात शहरात माता रेणुकादेवी मंदिर भगवान दत्त प्रभूंचे जन्मस्थान श्री दत्त शिखर मंदिर निद्रास्थान श्री देवदेवेश्वर मंदिर अनुसया माता मंदिर श्री महाकाली माता मंदिर पवित्र कैलाश टेकडी मंदिर पवित्र इंजाळा तलाव यासह बाबा सोनापिर दर्गाह शेख फरीद येथील बाबा शेख फरीद दर्गाह भगवान गौतम बुद्ध पुतळा मातृतीर्थ कुंड फुलतलाव पांडवलेणी यासह अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत
भाविक येथे आल्यानंतर आवर्जून रामगड किल्ल्यावर पर्यटनासाठी जातातच सोबत आंबटशोकिनही जातात त्यामुळे येथील मोठे दगड शिलालेख व इतर नक्काशिदार दगडांचे पार विद्रुपीकरण झाले आहे नावे लिहिणे प्रेम व्यक्त करणारे श्लोगण फोन नंबर कोरने हे करत असतांना बुरुजांचे ढिले झालेले दगड काढून फेकणे असे प्रकार सर्रास चालतात पुरातत्व विभागाचे राखणदार याकडे लक्ष देत नसल्याने दर्शनि भागावरचा बुरुज सात वर्षाअधि झालेल्या अतिवृष्टीमुळे ढासळला याच ठिकाणी असलेली किला मस्जिद चे छतही अर्धेअधिक ढासळले त्यामुळे किल्ला व नासधूस झालेल्या ठिकाणची दुरुस्ती करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनीकोट्यवधी रु चा निधी खर्च केला राष्ट्रध्वज फडकविला जात असलेले ठिकाण भक्कम मजबूत करण्यात आले
पाच वर्षां आधी हे ठिकाण राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी सज्ज असतांना व सार्वजनिक बांधकाम विभागाणे ही जागा राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी योग्य असल्याचे पत्र दिले असतांना पाच वर्षांपासून माहूर येथे तळ ठोकून बसलेले तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर हे रामगड किल्याच्या दर्शनी भागावर राष्ट्रध्वज का फडकवत नाही असा सवालही इलियास बावाणी यांनी उपस्थित केला आहे
देश स्वतंत्र झाल्यापासून दरवर्षी 15 आगस्ट 26 जानेवारी 1 मे 17 सप्टेंबर रोजी सर्व कार्यालयासह किल्याच्या दर्शनी भागावर राष्ट्रध्वज फडकवला जात होता गेल्या 6 ते 7 वर्षापासून हा कार्यक्रम बंद असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असून येत्या स्वतंत्र दिनी रामगढ किल्याच्या दर्शनी भागावर राष्ट्रध्वज फडकविला न गेल्यास राष्ट्रध्वज अवमान समजून संबंधीताविरुद्ध पोलिसात तक्रार देणार असल्याची माहिती इलियास बावाणी यांनी दिली आहे
राष्ट्रध्वज फडकविला जाण्याच्या आधी प्रत्येक वेळी अर्ज दिला असता जंगली जनावरे येतील सुरक्षा नाही किल्ल्यावर दिवसभर कोण बसेल झेंडा लावण्यायोग्य जागा ओटा खांब मजबूत असतांना खांब व्यवस्थित नाही अशी कारणे दाखवून राष्ट्रध्वज फडकविला जात नाही माहुरकरांसाठी अभिमानास्पद असलेली बाब हेतुपुरस्सर टाळली जात असल्याने जेष्ठ नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.