
रावेर (शरीफ शेख)
रावेर तालुक्यातील रहीवाशी संजय अर्जुन चौधरी यांची अखिल भारतीय ओबीसी महासभा महाराष्ट्र राज्य जळगाव च्या जिल्हाअध्यक्ष या पदावर प्रदेशअध्यक्ष श्री ऐड रघुनाथजी महाले साहेब यानी नियुक्ति केली. त्यांच्या नियुक्ति बद्दल रावेर तालुका अध्यक्ष योगेश पाटील , महिला तालुका अध्यक्षा शारदा चौधरी, भारत कुंवर, महेश तायडे, संतोष महाराज वाघोड़, नितिन चौधरी, भूषण चौधरी, मुज्जूशेख, रविंद्र हिवरकर, भिकारी तड़वी, संतोष परदेशी, अतुल जावरे, सईदशेख, आदिनी अभिनंदन केले.











































