Home नांदेड माहूर तहसीलदार यांच्या बदली साठी आता प्रहार चा ही पुढाकार

माहूर तहसीलदार यांच्या बदली साठी आता प्रहार चा ही पुढाकार

875

तक्रारी अर्जात अजून एका अर्जाची भर

माहूर:- माहूर येथील तहसीलदार मागील पाच वर्षां पासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत, लोकांना दमदाटी उध्दट वागणूक देऊन माझे काही करू शकत नाही असे सांगत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याने तहसिलदार पदाचा गैरवापर करीत असल्याने त्यांची इतरत्र बदली करावी असे तक्रारी अर्ज प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभा प्रमुख सतीश भाऊ बोंतावार यांनी महसूल मंत्री यांच्याकडे दिले आहे.

या ना त्या कारणाने माहूर चे तहसीलदार हे सतत वादात असतात.त्यांच्या वागणुकीवर या पूर्वी सुद्धा तक्रारी झाल्या आहेत.शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांनी दिनांक १० जानेवारी २० रोजी तर माजी नगराध्यक्ष फिरोज कादर दोसानी यांनी ०४/११/२० रोजी,महा विकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दिलीप मुंगीलवार यांनी ०२/११/२० रोजी तर आझाद समाज वादी पार्टी चे राहुल जिगळेकर यांची १९/११ /२० रोजी व भाजपाच्या दिव्यांग विभाग आघाडी चे प्रदेश कार्यकारणी सदस्य संजय जाधव यांनी ६/११/२० रोजी माहूर तहसीलदारांच्या विरोधात तक्रारी वरिष्ठांकडे केल्या आहे.त्यात बंजारा आदिवासी जनजागृती समितीचे संस्थापक अध्यक्ष आकाश जाधव, मनसे चे गजानन कुलकर्णी यांचा देखील समावेश होता.मात्र राज्य शासनाने कोरोना काळात बदल्या केल्या नसल्याने या सगळ्या तक्रारींचा गठा केवळ रेकॉर्ड म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालयात पडून राहिला. आता काल दिनांक ३ रोजी प्रहार कडून
अपंग विधवा दिव्यांगा च्या प्रश्नावर तहसीलदार माहूर यांना विचारणा केली की योग्य बोलत नाहीत, उध्दट पणाची वागणूक देत माझी कुठे तक्रार करायची तेथे करा,असे उर्मट बोलतात.त्या मुळे मी दिलेल्या तक्रारी पत्राची दखल घेऊन माहूर तहसिलदारांची बदली करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभा प्रमुख सतीश भाऊ बोंतावार यांनी महसूल मंत्री यांच्याकडे केली असून तक्रारी अर्जाची प्रत पक्षाचे अध्यक्ष ना. बच्चू कडू यांच्या कडे सुद्धा योग्य कार्यवाही साठी दिल्याने शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी, मनसे पाठोपाठ प्रहार जन शक्ती ने माहूर तहसीलदारांच्या बदली प्रकरणात उडी घेतली असून मनसे व्यतिरिक्त इतर चार ही पक्ष सत्ताधारी महाविकास आघाडीचे असल्याने सत्ताधारी यांच्या अर्जाचे वजन किती व या पूर्वी 5 वेळा नियमबाह्य पद्धतिचा अवलंब करून रद्द झालेल्या तहसीलदारांच्या बदल्यांची चौकशी कोणत्या दिशेने होईल या कडे माहूर करांचे लक्ष लागले आहे.