Home नांदेड वन्नाळी येथे शिक्षण परिषद संपन्न

वन्नाळी येथे शिक्षण परिषद संपन्न

199

मजहर शेख, नांदेड

नांदेड/देगलूर,दि, १२ :- नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथे “ब्रीज कोर्स” ‘सेतू’ अभ्यासक्रमावर आधारित एक दिवशीय शिक्षण परिषदेचे आयोजन शनिवार दिनांक (10) रोजी करण्यात आले होते.


जिल्हा परिषद नांदेड चे शिक्षण अधिकारी यांच्या आदेशाचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वन्नाळी केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक सहभागी होण्यासाठी आव्हान करण्यात आले होते त्यानुषंगाने वन्नाळी केंद्रातील बहूसंख्य शाळातिल मुख्याध्यापक व शिक्षिका व शिक्षकांनी आपली उपस्थिती नोंदविली याप्रसंगी सेतु अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या पायाभूत अभ्यासक्रमावर आधारित अध्ययन व अध्यापन करावे शासनाच्या विविध आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे असेही यावेळी सांगण्यात आले या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मुख्याध्यापक श्री पुंडलिक टोके होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रप्रमुख श्री वडजे व्ही एन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले याप्रसंगी केंद्रीय प्राथमिक शाळा अंबुलगा येथील केंद्रप्रमुख एस एल दासरवार, मुख्याध्यापक नल्लामडगे ,जि. प .प्रा. शा सुगावचे मुख्याध्यापक श्री लोणी जी. जे.,श्री जाधव बी. इ.(मुख्याध्यापक तडखेल), प्रगति माध्यमिक विद्यालय सुगावचे श्री नाईकवाडे बालाजी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी आर जाधव यांनी केले तर श्री जी जे लोणे यांनी आभार व्यक्त केले