Home जळगाव खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते भडगाव ग्रामीण रुग्णालयात वृक्षारोपण

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते भडगाव ग्रामीण रुग्णालयात वृक्षारोपण

294
माऊली फाउंडेशन आयोजीत कार्यक्रम उत्साहात संपन्न

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील उपक्रमशील फाउंडेशन म्हणुन नावलौकिक असलेल्या माऊली फाउंडेशनने वृक्षारोपण करुन न थांबता त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. याचा आनंद असुन वृक्ष लागवड व संवर्धन करण्यासाठी समाजात सांघिक भावना वाढीस लागावी अशी अपेक्षा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. आज ग्रामीण रुग्णालय भडगाव परिसरात खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तहसीलदार सागर ढवळे, पालिका मुख्याधिकारी विकास नवाळे भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी,भडगांव भाजपचे माजी तालुकाध्यक्ष पत्रकार सोमनाथ पाटील, गटविकास अधिकारी संजय लखवाल, वैद्यकिय अधिकारी पंकज जाधव, पोलिस निरीक्षक अशोक उतेकर, माजी सैनिक आबासाहेब गरुड, विठ्ठल पाटील, युवा मोर्चा चे शैलेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर सुर्यवंशी यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे स्वागत केले. यशस्वीतेसाठी युवराज सूर्यवंशी, देवेंद्र पाटील, जाकीर कुरेशी, योगेश शिंपी, सुशील महाजन, रवींद्र कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी, डॉ. निलेश महाजन, गणेश पाटील, अमित दुसाने, सुरेश कोळी, सुजित दुडे, करिमा खान, वैशाली पाटील, स्वप्नील सूर्यवंशी,अजित दूडे यांनी परिश्रम घेतले.