Home विदर्भ “कृषीदिना विषयी ग्रामीण लोकप्रतिनिधींमध्ये उदासीनता”

“कृषीदिना विषयी ग्रामीण लोकप्रतिनिधींमध्ये उदासीनता”

453

यवतमाळ / घाटंजी – हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची 1जुलै ही जयंती शासन स्तरावर “कृषीदिन” म्हणून साजरी करण्याचे शासकीय आदेश आहेत. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कृषीदिन साजरा करण्यात आला. पंचायत समिती घाटंजी येथील स्व वसंतराव नाईक सभागृहात देखील हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यातील कृषी क्षेत्रात या वर्षी वेगवेगळे प्रयोग करून यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले. मात्र या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती सौ. निताताई आकाश जाधव वगळता सहा पैकी एकही सदस्य आणि ज़िल्हा परिषदेच्या तीन पैकी एकही सदस्य उपस्थित नव्हते. कृषीदिन अर्थात शेती आणि शेतकरी यांच्या प्रति ग्रामीण भागातून लोकप्रतिनिधी निवडून येणाऱ्यांना किती उदासीनता आहे हे दिसून येते. तसेच घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये “कृषीदिन” प्रोटोकॉल म्हणून कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत “पार पाडला”. कृषी उत्पन्न बाजार समितीचा आत्मा असलेली शेती आणि शेतकरी यांचा बहुमान करणारा दिवस म्हणजे कृषीदिन. मात्र या वेळी बाजार समिती सभापती व संचालक यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवणे हा शेती आणि शेतकरी यांचा अपमान आहे. शेती आणि शेतकरी यांच्याविषयी इतकी अनास्था असणारे सभापती आणि त्यांचे संचालक खरंच पाच वर्षे शेतकऱ्यांच्या हितासाठी किती काम करत असतील हा प्रश्नच आहे अशी भावना “जस्टीस फॉर एज्युकेशन” चे संचालक श्रीकांत राठोड यांनी व्यक्त केली.