
रावेर (शरीफ शेख)
स्टुडंट्स इस्लामिक अर्गनायझेशन ( SIO ) महाराष्ट्र उत्तर विभागाचे अध्यक्ष तारीक जकी तर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत SIO ने दिलेल्या निवेदना मध्ये MPSC मार्फत राज्यसेवा परीक्षा पास होऊन उप जिल्हाधिकारी , पोलिस उप अधीक्षक , तहसीलदार अशा पदांवर निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या 1 वर्षापासून रखडलेल्या नियुक्ती लवकरात लवकर द्यावी अशी मागणी केली.
या बाबत एस आई ओ तर्फे निवासी नायब तहसीलदार श्री पवार यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा 2019 परीक्षा 413 पदांसाठी घेण्यात आली , या परीक्षेचा अंतिम निकाल 19 जून 2020 रोजी लागून 1 वर्ष होत आले तरी राज्य सरकार उप जिल्हाधिकारी , पोलिस उप अधीक्षक , तहसीलदार अशा महत्वाच्या पदांवर निवड झालेल्या अधिकार्याच्या नियुक्ती देण्याबाबत उदासीनता दाखवत आहे . विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन 5-6 वर्ष अभ्यास करून सरकारी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहिले . बहुतांशी आई वडील शेतकरी , शेत मजूर , कामगार असे आहेत . आज देशात शेतकरी आत्महत्या करत असताना , त्यानी काबाड कष्ट करून सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी जीवाचे रान करून आभ्यास केले आणि उप जिल्हाधिकारी , पोलिस उप अधीक्षक , तहसीलदार अशा पदांसाठी निवडले गेले . तरीही शासन त्याना नियुक्ती देत नाही आणी ते प्रचंड आर्थिक , सामाजिक आणि मानसिक तणावाला सामोरे जात आहोत . या नियुक्ती बाबत सुप्रीम कोर्टानेही निर्णय दिला आहे त्यामुळे स्टुडंट्स इस्लामिक अर्गनायझेशन ( SIO ) महाराष्ट्र उत्तर विभागाचे विविध ठिकाणी प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर निवेदनाद्वारे वेळ न घालवता नियुक्तीपत्र लवकरात लवकर द्यावे अशी मागणी करण्यात आली. अशी माहिती SIO चे मीडिया सचिव शोएब आसिम यांनी दिली.











































